मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Gudi Padwa 2023 : ढोल-ताशांचा गजर आणि नऊवारीचा थाट, गिरगावच्या शोभायात्रेत तरुणाईचा जल्लोष! Video

Gudi Padwa 2023 : ढोल-ताशांचा गजर आणि नऊवारीचा थाट, गिरगावच्या शोभायात्रेत तरुणाईचा जल्लोष! Video

गुढीपाडव्यानिमित्त गिरगावमध्ये काढण्यात आलेल्या शोभायात्रेत नऊवारी साडीतील महिलांचा लक्षणीय सहभाग होता.

गुढीपाडव्यानिमित्त गिरगावमध्ये काढण्यात आलेल्या शोभायात्रेत नऊवारी साडीतील महिलांचा लक्षणीय सहभाग होता.

गुढीपाडव्यानिमित्त गिरगावमध्ये काढण्यात आलेल्या शोभायात्रेत नऊवारी साडीतील महिलांचा लक्षणीय सहभाग होता.

  • Local18
  • Last Updated :
  • Mumbai, India

    धनंजय दळवी, प्रतिनिधी

    मुंबई, 22 मार्च :   गुढीपाडव्यानिमित्त मुंबईत सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. प्रत्येक मुंबईकर आपल्या पद्धतीनं नव्या वर्षाचं स्वागत करतोय. आजच्या दिवशी घरोघरी गुढी उभारण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर गोड जेवणाचाही बेत आहे. काही जणांची पावलं सोनं खरेदीसाठी सराफाच्या दुकानात वळाली आहेत. गुढीपाडव्यानिमित्त निघाणारी शोभायात्रा ही देखील आता मुंबईच्या संस्कृतीचं वैशिष्ट्य बनली आहे.

    मुंबईतील गिरगावात गुढीपाडव्या निमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभा यात्रेला ढोल ताशांच्या गजरामध्ये सुरुवात झाली असून मुंबईतली नावाजलेली ढोल पथक यामध्ये सहभागी झाली होती. गिरगाव ढोल ताशा ध्वज पथक, मोरया ढोल ताशा पथक , जगदंब ढोल ताशा पथक, या ढोल ताशा पथकांच्या आवाजात गिरगावकर मंत्रमुग्ध झाले.

    यंदा गिरगावच्या शोभायात्रेचं 21 वे वर्ष आहे. यामध्ये  महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. ध्वजधारी, ढोल वाजवताना तसंच बाईक रॅलीमध्येही महिलांची संख्या लक्षणीय होती.  उत्साही तरुण वर्गानं गिरगावच्या शोभा यात्रेत चैतन्य निर्माण केलं होतं. त्याचबरोबर यावेळी अनेकांनीच पारंपरिक वेशभूषेला प्राधान्य दिलं होतं. या शोभायात्रेमध्ये  चित्ररथ, भव्य दिव्य अशा रांगोळी, त्याचबरोबर भारताने 75 वर्षात केलेले प्रगतीचे देखावे साकारण्यात आले होते.

    डोंबिवलीच्या शोभायात्रेत आरोग्याचा जागर, योगासनातून समजावलं महत्त्व, Video

    प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील कर्तव्यपथावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारा साडेतीन शक्तीपीठ यावरील चित्र यावर्षी यात्रेतील विशेष आकर्षण असणार आहे. तसेच ठाकूरद्वार नाका येथे नववर्ष संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले आहे

    First published:
    top videos

      Tags: Gudi Padwa 2023, Local18, Mumbai