Home /News /mumbai /

सामान्य रेल्वे प्रवाशांना दिलासा कधी? 15 जूनपर्यंत तरी रेल्वेची दारं बंद

सामान्य रेल्वे प्रवाशांना दिलासा कधी? 15 जूनपर्यंत तरी रेल्वेची दारं बंद

Mumbai Local Train:राज्य सरकारने लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ज्या ठिकाणी रुग्णसंख्येत घट झाली आहे तेथील नियमांत शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला आहे.

    मुंबई, 31 मे: राज्यातील कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा (Coronavirus second wave) संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने (Maharashtra Government) ब्रेक द चेन (Break The Chain) अंतर्गत कठोर निर्बंध लागू केले. राज्य सरकारने लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ज्या ठिकाणी रुग्णसंख्येत घट झाली आहे तेथील नियमांत शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान राज्य सरकारनं सामान्य लोकांसाठी लोकल ट्रेन (Local Train) सुरु करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचं समजतंय. रेल्वेच्या एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकार आणि काही उच्च स्तरीय अधिकाऱ्यांशी अनौपचारिक चर्चा झाली. या चर्चेतून लोकल ट्रेन सुरु करण्याबाबत सरकारनं काही निर्णय घेतला नाही आहे. त्यामुळे सामान्य रेल्वे प्रवाशांना आणखी काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे. राज्य सरकार टप्प्याटप्यानं निर्बंधांमध्ये शिथिलता आणणार आहे. त्यात चार टप्पे असतील. चौथ्या टप्प्यात लोकल रेल्वे सुरु करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. त्यामुळे 15 जूननंतर सरकार यावर निर्णय घेईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. हेही वाचा-वाईट! संशयावरुन एकाचा घात, बेदम मारहाणीत जमावाकडून एकाची हत्या 15 जूनपर्यंत तरी कोणतेही बदल होणार नसल्याचं रेल्वे अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान जून महिन्यात लोकांची गर्दी वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. सरकारी कार्यालयांमध्ये काम करणारे कर्मचारी आणि पावसाची तयारी करणाऱ्या संस्थांमधील कर्मचाऱ्यांची संख्या पुढच्या महिन्यात वाढू शकते. लोकलची गर्दी येत्या काळात 50 हजारांवरुन एक लाख होऊ शकते, असं रेल्वे अधिकाऱ्यानं सांगितलं. सामान्य प्रवाशांसाठी असा असू शकतो लोकल प्रवास सामान्य लोकांना रेल्वेतून प्रवास करण्याची मुभा दिल्यानंतर राज्य सरकार बहुतांश तरी जुन्या फॉर्मुलाचा वापर करण्याची शक्यता रेल्वे अधिकाऱ्यानं वर्तवली आहे. जुन्या फॉर्म्युलानुसार, सकाळी 7 वाजेपर्यंत सामान्य प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी. तसंच दुपारी 12 ते 4 आणि संध्याकाळी 7 वाजल्यानंतर पुन्हा सामान्य रेल्वे प्रवाशांना प्रवास करता येऊ शकतो, असं अधिकाऱ्यानं सांगितलं. अजूनही लाखो लोकं करतायत प्रवास लॉकडाऊनच्या काळातही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची गर्दी पाहायला मिळते. शनिवारी आणि रविवारी ही गर्दी थोड्या फार प्रमाणात कमी दिसते. मध्य रेल्वे मार्गावर गेल्या शनिवारी 4 लाख तर रविवारी 2.5 लाख लोकांनी प्रवास केला. पश्चिम रेल्वेवर ही संख्या जवळपास 2 लाखांच्या आसपास होती. हेही वाचा- खतरनाक! देशात पेट्रोलच्या दरानं गाठली उच्चांकी, किंमत ऐकून बसेल धक्का काय म्हणाले होते विजय वडेट्टीवार मुंबईत लोकल बंद असल्यामुळे कोरोनाचा आकडा कमी झाला आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरु आहे आणि त्याचा परिणाम दिसून येतोय. मुंबई लोकलवर आणखी काही दिवस निर्बंध लावणं आवश्यक आहे. सरसकट सूट दिली तर पुन्हा गर्दी होईल. त्यामुळे गर्दी कमी करण्यासाठी आणखी 15 दिवस तरी लोकल सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरु करता येणं शक्य नसल्याचं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं होतं.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Coronavirus, Mumbai local, Train

    पुढील बातम्या