Home /News /national /

जगाच्या Covid - 19 लढ्यात भारताची साथ, मॉरिशस सरकारने मानले पंतप्रधान मोदींचे आभार

जगाच्या Covid - 19 लढ्यात भारताची साथ, मॉरिशस सरकारने मानले पंतप्रधान मोदींचे आभार

मॉरिशसच्या सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद दिलं आहे.

    नवी दिल्ली, 16 एप्रिल : जगात कहर माजवणाऱ्या कोरोनाचा (Coronavirus) गुणाकार सुरू झाला आहे. आतापर्यंत देशात 12000 कोरोनाबाधितांची (Covid - 19) संख्या पोहोचली असून मृतांचा आकडा 400 हून अधिक झाला आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी अधिक सावध राहणे गरजेचे आहे. यापूर्वी भारताने अमेरिकेला औषधांची मदत केली आहे. त्यानंतर आज माॅरिशसचे (Mauritius) पंतप्रधान प्रविंद जुगनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहे. त्यांनी ट्विट करुन धन्यवाद व्यक्त केले आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे आभार मानतो. भारत सरकारकडून दिलेल्या वैद्यकीय डोशेनशनसाठी मी आपला आभारी आहे. ही मदत काल 15 एप्रिल रोजी एअर इंडियाच्या विशेष फ्लाईटने मॉरिशसला पोहोचली. मॉरिशसला हाइड्रॉक्सीक्लोरिक्वीनसह इतर काही अत्यावश्यक औषधे पाठविण्यात आले आहे. मॉरिशससाठी पाठविल्या जाणार्‍या 13 टन जीवनावश्यक औषधांचा हा पहिला भाग होता. आवश्यक औषधांची दुसरी खेप येत्या आठवड्यात पाठविण्यात येणार आहे. भारत हा मॉरिशसचा विश्वासू देश आहे आणि मॉरिशसमधील सर्व लोकांचे कल्याण आणि सार्वजनिक कल्याणात हातभार लावण्यासाठी वचनबद्ध आहे. या कठीण काळात भारत मॉरिशसबरोबर जवळून कार्य करत असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी अमेरिकेने भारताकडे हाइड्रॉक्सीक्लोरिक्वीन या औषधाची मागणी केली. कोरोना विषाणूवर अद्यापतरी कोणतीही लस उपलब्ध झालेली नाही. अमेरिकेत हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा वापर कोरोनाग्रस्तांच्या उपचारांसाठी केला जात आहे. जगात सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण अमेरिकेत आहेत. त्यामुळे भारताने अमेरिकाला या औषधांचा पुरवठा केला आहे. संबंधित - मुंबई फायर ब्रिगेड मुख्यालयात कोरोनाची एन्ट्री, अधिकाऱ्याच्या पत्नी-मुलीला लागण आनंदाची बातमी: राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Coronavirus, Narendra modi

    पुढील बातम्या