मुंबई, 16 एप्रिल : देशभरात कोरोना (Coronavirus) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या संकटात मैदानात जाऊन लढणाऱ्या अनेक डॉक्टर, नर्सेस आणि पोलीस यांनाही कोरोनाने (Covid -19) विळखा घातला आहे. त्यातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई फायर ब्रिगेडच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
मुंबईतील) वरिष्ठ अधिकाऱ्याची पत्नी आणि मुलगी या दोघी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. उपचारासाठी दोघींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी अधिकारी आणि त्यांच्या मुलाची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. मात्र सुरक्षिततेसाठी त्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.
रुग्णांना भेटण्यासाठी अधिकारी कार्यालयाची गाडी घेवून जात असल्यामुळे प्रकरण उघडकीस आल्याचे सांगितले जात आहे. मात्र यामुळे इतर सहकाऱ्यांना लागण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यानंतर मुंबईतील अग्निशमन दलाच्या हेडक्वार्टरचे दोन मजले क्वारंटाइन करण्यात आले आहे. याशिवाय इतर दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही क्वारंटाइन करण्यात आलं आहे. इतर सहकाऱ्यांना लागण होण्याची भीती वाटतं असल्याची माहिती. यापूर्वी कार्यालयात आलेल्यांची तपासणी केली जात आहे. याशिवाय अधिकाऱ्यांच्या संपर्कात आलेल्यांचीही तपासणी केली जात आहे.
सध्या देशभरात झपाट्याने कोरोनाची संख्या वाढत आहे. अशावेळी नागरिकांनी अधिक सजग राहण्याची आवश्यकता आहे. लॉकडाऊनचे पालन व वैयक्तिक स्वच्छता हा यातील महत्त्वाचा भाग आहे.
संबंधित - सोलापुरातून कोरोनाची धक्कादायक बातमी, 'ती' एक महिला ठरली 10 जणांसाठी घातक
मेडिकल रिपोर्टमधली एक चूक आणि 66 वर्षांचे आजोबा निघाले कोरोना 'पॉझिटिव्ह'
संपादन, संकलन - मीनल गांगुर्डे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus