Home /News /mumbai /

टीका करण्यापेक्षा मोदींकडे मदतीसाठी बोला, राष्ट्रवादीच्या नेत्याचा फडणवीसांना टोला

टीका करण्यापेक्षा मोदींकडे मदतीसाठी बोला, राष्ट्रवादीच्या नेत्याचा फडणवीसांना टोला

'विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस मात्र रोज राजभवनावर जाऊन सरकार विरोधात राज्यपालांना निवेदनं देऊन घाणेरडे राजकारण करत आहेत'

मुंबई, 20 मे : 'कोरोना व्हायरसच्या अभूतपूर्व संकटकाळात सरकार, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस प्रशासन सर्वजण मिळून लढत आहेत. पण विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस मात्र रोज राजभवनावर जाऊन सरकार विरोधात राज्यपालांना निवेदनं देऊन घाणेरडे राजकारण करत आहेत' अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. तसंच, 'या संकट काळात राजकारण न करता राज्याला केंद्र सरकारकडून मदत मिळवून देण्यासाठी फडणवीस पुढाकार का घेत नाहीत? असा सवालही लोंढे यांनी उपस्थित केला आहे. 'देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्यपालांची यांची भेट घेऊन मुंबईत कोरोनाच्या रुग्णांना योग्य त्या सुविधा मिळत नाहीत, बेड उपलब्ध नाहीत, लोकांची उपासमारही होत आहे असे आरोप सरकारवर केले. राज्यात लोकनियुक्त सरकार असताना फडणवीस वारंवार राज्यपालांकडे जाऊन महाराष्ट्र विकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यावर संकट असतानाही भाजपला राजकारणाशिवाय काही सुचत नाही', अशी टीकाही लोंढे यांनी केली. हेही वाचा -रिलायन्सच्या राइट्स इश्यूचा पहिल्या दिवशी प्रीमियमवर व्यापार   तसंच, 'जीएसटीमुळे राज्याचे महसुली स्रोत आटले आहेत. जीएसटी, केंद्राच्या विविध योजनांचे अनुदान व इतर करांच्या रुपाने मिळणारे जवळपास 21 हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम केंद्राकडून महाराष्ट्राला येणे बाकी आहे. राज्याला निधीची आवश्यकता असताना देवेंद्र फडणवीस यांनी मोदींकडे आपले वजन खर्च करून राज्याच्या हिश्याचे पैसे मिळवून द्यावेत. महाराष्ट्राच्या भल्यासाठी आपण काही विधायक काम केले असते तर आपली राज्यातील प्रतिमाही उंचावली असती व ती मुख्यमंत्रिपदावर राहिलेल्या व्यक्तीला साजेशी ठरली असती. परंतु, असं न करता फक्त विरोधासाठी विरोध करण्यात आपण वेळ घालवत आहात हे दुर्दैवी आहे' असा टोलाही त्यांनी लगावला. 'पश्चिम महाराष्ट्रात पूर आला होता तेव्हा कुठे होता?' 'देवेंद्रजी आपण व आपल्या पक्षाचे आमदार, खासदार महाराष्ट्रात मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पैसे न देता पीएम केअर्सला पैसे देतात. याचा अर्थ मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देऊ नका असा होतो. कोल्हापूर, सातारा, सांगलीला महापूर आला तेव्हा आपण मुख्यमंत्री होतात. लाखो हेक्टरवरील पिकं वाया गेली, हजारो जनावरे वाहून गेली, लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाले त्यावेळी आपण काय केले? अलमट्टी धरणाचे पाणी सोडणे गरजेचं असताना त्यासाठी आपण काहीही केले नाही. कर्नाटक, महाराष्ट्र व केंद्रातही भाजपाचे सरकार होते पण आपण पंतप्रधान मोदींना एक फोनही केला नाही', अशी टीकाही त्यांनी केली. हेही वाचा - कर्मचाऱ्यांची परिस्थिती बिकट! Uber पाठोपाठ आता OLA कंपनीची मोठी घोषणा भाजपच्या ट्वीटर अकाऊंटवर जुना व्हिडिओ टाकून क्वारंटाइन सेंटरमध्ये रुग्णांना सुविधा मिळत नाहीत, असा आरोप आपल्या पक्षाने केला. फसगत झाल्यावर तुम्ही माघार घेतली हे लोकांच्या नजरेतून सुटलेले नाही, देवेंद्र फडणवीस यांचे सध्याचे वागणे म्हणजे रोम जळत असताना निरो बासरी वाजवत होता असेच आहे' असा टोलाही लोंढे यांनी लगावला. संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

Tags: BJP, देवेंद्र फडणवीस, भाजप, राष्ट्रवादी

पुढील बातम्या