कर्मचाऱ्यांची परिस्थिती बिकट! Uber पाठोपाठ आता OLA कंपनीची मोठी घोषणा

कर्मचाऱ्यांची परिस्थिती बिकट! Uber पाठोपाठ आता OLA कंपनीची मोठी घोषणा

लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प असल्याने अनेकजणांच्या नोकरीवर कुऱ्हाड येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 20 मे : कोरोनासारख्या (Coronavirus) जीवघेण्या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अर्थव्यवस्थेला नुकसान झाल्यामुळे अनेकांच्या हातून नोकऱ्या गेल्या आहेत. उबर, स्विगीनंतर आता कॅब एग्रीगेटर कंपनी ओलाने रायडर्स, फायनॅन्शल सर्व्हिसेस आणि फूड बिझनेसच्या 1400 कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. कोरोनाच्या आजारामुळे गेल्या दोन महिन्यांपासून कंपनीच्या महसुलात मोठी घट झाली आहे. यासाठी कंपनीचे सीआओ भावेश अग्रवाल यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसच्या संकटामुळे गेल्या दोन महिन्यांपासून प्रवासी, वित्तीय सेवा आणि फूड व्यवसायाचा महसूल 95 टक्क्यांनी घटला आहे. परिणामी येथील 1400 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढण्यात येत आहे.

सांगितले जात आहे की, यापूर्वी ऑनलाईन टॅक्सी सेवा देणारी कंपनी उबरदेखील 3000 जणांना नोकरीवरुन काढून टाकण्याचा विचार करीत असल्याचे सांगितले होते. मे महिन्यात उबरने 3700 कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याची घोषणा केली होती. याशिवाय उबरने तब्बल 45 कार्यालये बंद करण्याचा प्लानही केला आहे. येत्या 12 महिन्यात उबर आपले सिंगापूर कार्यालय बंद करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशभरात कोरोनाचा फैलाव वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. लॉकडाऊन सुरू असल्याने अनेक सेवा सध्या ठप्प आहे. काही विभागात हळूहळू कामाला गती दिली जात आहे. मात्र कोरोनाचा कहर लक्षात घेता सर्व सेवा पूर्ववत होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो. गेल्या दोन महिन्यांपासून काम ठप्प असल्याने अनेक कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर कुऱ्हाड येण्याची शक्यता आहे.

संबंधित -घृणास्पद कृत्य! क्रुरपणे लेकीच्या गळ्यावरुन फिरवला सुरा; मृतदेह फेकला नदीत

शिवसेनेमुळेच मुंबईकरविरुद्ध गावकरी वाद पेटला, भाजप नेत्याचा खोचक आरोप

 

 

First published: May 20, 2020, 4:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading