रिलायन्सच्या राइट्स इश्यूचा पहिल्या दिवशी 'प्रीमियम'वर व्यापार, आजपासून सब्सक्रिप्शन सुरू

रिलायन्सच्या राइट्स इश्यूचा पहिल्या दिवशी 'प्रीमियम'वर व्यापार, आजपासून सब्सक्रिप्शन सुरू

आजपासून रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेड (RIL) चे राइट्स इश्यू आजपासून खुले करण्यात आले आहेत. बाजार भांडवलाबाबत अव्वल असलेल्या रिलायन्सकडून शेअर खरेदी करण्याची ही सुवर्णसंधी आहे.

  • Share this:

मुंबई, 20 मे : आजपासून रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेड (RIL) चे राइट्स इश्यू आजपासून खुले करण्यात आले आहेत. बाजार भांडवलाबाबत अव्वल असलेल्या रिलायन्सकडून शेअर खरेदी करण्याची ही सुवर्णसंधी आहे. गेल्या तीन दशकांमध्ये पहिल्यांदा रिलायन्सने राइट्स इशू आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे ही आतापर्यंतची सर्वात मोठी इक्विटी ऑफर आहे. आजपासून सुरू होणाऱ्या भागविक्री प्रक्रियेतून रिलायन्स कंपनी 53,125 कोटी रुपयांची रक्कम जमा करणार आहे. यापैकी तीन चतुर्थांश रक्कम रिलायन्स समूहाकडून कर्जफेडीकरिता वापरली जाणार आहे. अर्थात 39,755.08 कोटी रुपये कर्जफेडीकरता वापरले जाणार आहेत, असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. रिलायन्स समुहावरील कर्ज कमी करण्यासाठी रिलायन्सच्या जिओ प्लॅटफॉर्म्स मध्ये फेसबुकसह एकूण 4 मोठ्या विदेशी कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे

(हे वाचा-कधी सुरू होणार विमानसेवा? जाणून घ्या नागरी उड्डाण मंत्र्यांनी काय दिली माहिती)

या राइट्स इशूअंतर्गत कंपनीतील सध्याच्या शेअरहोल्डर्सना कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची संधी मिळत आहे. राइट्स इशूअंतर्गत ज्या गुंतवणुकदारांकडे 14 मे पर्यंत आरआयएलचे शेअर्स असतील त्यांना प्रत्येक 15 शेअर्सवर एक राइट इश्यू घेण्याची संधी देण्यात येणार आहे. आरआयएलच्या राइट्स इश्यूची किंमत 1257 रुपये आहे. यामध्ये गुंतवणुकदारांना अशी सूट देण्यात आली आहे की, सध्या ते 25 टक्के रक्कम देऊन शेअर घेऊ शकतात. म्हणजेच त्यांना अपफ्रंट फक्त 314.25 रुपये द्यावे लागतील. त्यानंतर 25 टक्के रक्कम मे 2021 पर्यंत द्यावी लागेल आणि उर्वरित 50 टक्के नोव्हेंबर 2021 पर्यंत द्यावे लागतील.

(हे वाचा-लॉकडाऊनमध्ये छोट्या व्यवसायिकांसाठी खूशखबर! फेसबुक सुरू करणार 'ऑनलाइन दुकान')

RE (Rights Entitlements) शेअर्स 193 रुपयांवर ट्रेड करत होते. दुपारी 1.28 वाजता आरआयएल (RIL) शेअर्स 1429 रुपयांवर ट्रेड करत होते. राइट इशूची किंमत 1257 रुपये आहे आणि त्यामुळे सध्याचा बाजारभाव आणि राइट्स इश्यूच्या किंमतीतील फरक 172 रुपयांचा आहे. त्यामुळे रिलायन्सचा हे शेअर्स 'प्रीमियम'वर ट्रेड करत आहेत. अर्थात त्यांची किंमत बाजारभावापेक्षा जास्त आहे. RE मधील ट्रेडिंग 29 मे रोजी बंद होणार आहे.

आरआयएलचा राइट्स इश्यू सेल सर्वात मोठा शेअर सेल आहे. 2019 मध्ये भारती एअरटेलने 25,000 कोटी रुपयांचे राइट्स इश्यू जारी केले होते. आरआयएलचे राइट्स इश्यू त्याच्या दुप्पट आहेत.

First published: May 20, 2020, 3:57 PM IST

ताज्या बातम्या