मराठीतील प्रसिद्ध दिगदर्शक रवी जाधव यांनी स्वतःच्या हाताने आपल्या लाडक्या बाप्पाची देखणी मूर्ती साकारली आहे. रवी जाधव यांनी नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दोन सुंदर फोटो शेयर करत सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये रवी यांनी एक कलर न केलेला बाप्पा आणि नंतर अष्टगंधासारखा कलर दिलेला गणपती असे दोन सुंदर फोटो शेयर केले आहेत. (हे वाचा:तैमुरसह करीनाने केली बाप्पाची पूजा; छोट्या नवाबने हाताने साकारला बाप्पा) यावर्षी १० सप्टेंबर म्हणजे आज बाप्पा विराजमान झाले आहेत. सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. बाप्पाच्या आगमनाने वातावरण अगदी प्रसन्न बनले आहे. गेल्या दिड वर्षांपासून सुरु असलेल्या कोरोना परिस्थितीमुळे गणेशोत्सवावरदेखील काही बंधने आली आहेत. मात्र यावर्षी कोरोना नियमांचं पालन करून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी गेली अनेक दिवस भक्त तयारी करत होते. आज अखेर बाप्पा विराजमान होत सर्वांना खुश केलं आहे. (हे वाचा:अनन्या पांडेनं केलं बाप्पाचं स्वागत! पारंपरिक ड्रेसमध्ये दिसली खूपच सुंदर) रवी जाधव यांच्याबद्दल सांगायचं झालं. तर ते मराठीतील एक उत्तम दिगदर्शक म्म्हणून ओळखले जातात. त्यांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारसुद्धा पटकावला आहे. त्यांनी बालक-पालक, बालगंधर्व, टाईमपास, नटरंग, कॉफी आणि बरंच काही असे अनेक उत्कृष्ट चित्रपट त्यांना मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. रवी जाधव यांनी सर जेजे इंस्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टमधून व्हिज्युअल आर्ट आणि ग्राफिक डिझाईनचा अभ्याससुद्धा केला आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi entertainment