आजपासून सगळीकडे गणेशोत्सव सुरू झाला आहे. घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. अभिनेत्री करीना कपूरच्या घरीही बाप्पाचं आगमन झालं आहे. तिने पती सैफ अली खान आणि मुलगा तैमुरसोबत बाप्पाची पूजा केली.
2/ 7
करीनाच्या घरी बाप्पाचं आगमन झालं असून पूजा करताना सगळे दिसत आहेत. नेहमीच चर्चेत राहणरा लहाणगा तैमुर देखील कुर्ता परिधान करत पूजा करताना दिसत आहे.
3/ 7
इतकच नाही तर तैमुरने स्वतःच्या हाताने बाप्पा साकारला आहे. चिकन मातीपासून त्याने सुंदर मुर्ती साकारली आहे. करीनाने मुलाचं कौतक करत त्याचे फोटो शेअर केले आहेत.
4/ 7
यावेळी करीना देखील पांढऱ्या कुर्त्यात दिसली. मुलगा तैमुरला ती पूजा करण्यास शिकवत असल्याचं दिसत आहे.
5/ 7
करीना नेहमीच आपल्या कुटुंबियांसोबत सण साजरे करताना दिसते. आई वडील आणि बहीण करिश्मासोबत नेहमीच ती वेळ घालवते.
6/ 7
करीना दुसऱ्यांदा आई झाली आहे. तर तैमुरला लहाण भाऊ जहांगिर मिळाला आहे. त्यामुळे ती कुटुंबाकडे जास्तीत जास्त लक्ष देताना दिसते. काही दिवसांपूर्वीच तिने कुटुंबासोबत ट्रीप केली होती.
7/ 7
तैमुर देखील प्रत्येक सण साजरा करताना दिसतो. याशिवाय त्याच्या मित्रमैत्रीणींसोबतही मस्ती करताना दिसतो. काही दिवसांपूर्वीच करीनाने त्याच्या मित्रांसोबत त्याचे काही फोटो शेअर केले होते.