मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /'पवारांनी केलेलं करेक्ट वर्णन काँग्रेसवर चपखल लागू होतंय' देवेंद्र फडणवीसांनी साधला करेक्ट निशाणा

'पवारांनी केलेलं करेक्ट वर्णन काँग्रेसवर चपखल लागू होतंय' देवेंद्र फडणवीसांनी साधला करेक्ट निशाणा

Devendra Fadnavis on Sharad Pawar statement about Congress party: शरद पवारांनी काँग्रेस पक्षाचं केलेल्या वर्णानावर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया देत निशाणा साधला आहे.

Devendra Fadnavis on Sharad Pawar statement about Congress party: शरद पवारांनी काँग्रेस पक्षाचं केलेल्या वर्णानावर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया देत निशाणा साधला आहे.

Devendra Fadnavis on Sharad Pawar statement about Congress party: शरद पवारांनी काँग्रेस पक्षाचं केलेल्या वर्णानावर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया देत निशाणा साधला आहे.

मुंबई, 10 सप्टेंबर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी काँग्रेस पक्षाच्या (Congress Party) सध्याच्या स्थितीबाबत आपली भूमिका मांडली त्यावर देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) प्रतिक्रिया देत निशाणा साधला आहे. शरद पवारांनी केलेले वर्णन हे काँग्रेससाठी चपखल लागू होणारे आहे. काँग्रेस जुन्या पुण्याईवर जगतेय अशी प्रतिक्रिया देत काँग्रेस पक्षावर फडणवीसांनी निशाणा साधला आहे.

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

मला असं वाटतं काँग्रेसचं यापेक्षा करेक्ट वर्णन हे दुसरं असूच शकत नाही. कारण काँग्रेस जुन्या पुण्याईवर जगतेय. असं म्हणतात की, मालगुजारी तर गेली आता उरलेल्या मालावर गुजरान चाललं आहे तशा प्रकारचंच वर्णन शरद पवारांनी केलं आहे. पवार यांनी केलेले वर्णन चपखल लागू होणारे आहे.

काय म्हणाले होते शरद पवार?

मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी काँग्रेस पक्षाबाबत आपली भूमिका मांडली. शरद पवारांनी म्हटलं होतं की, "उत्तरप्रदेशातल्या जमीनदारांकडे मोठी शेती आणि हवेली होती पण लँड सिलिंगचा कायदा आला आणि त्यांच्या जमीनी गेल्या आणि हवेली राहिली. जुनी झालेली ही हवेली दुरुस्त करण्याची ताकद त्या जमीनदारांमध्ये उरली नाही. हजार एकर जमीन 15-20 एकरावर आली. सकाळी उठून जमीनदार हवेलीच्या बाहेर बघतो तेव्हा त्याला समोर हिरवं पिक दिसतं. तेव्हा तो हे सर्व पीक माझं होतं असं सांगतो. पण आता नाही. काँग्रेसची अवस्था जमीन नसलेल्या जुन्या जमीनदारासारखी झाली आहे.

शरद पवारांनी पुढे म्हटलं, काँग्रेस एकेकाळी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत होती, पण आता तसं नाही, हे मान्य केलं पाहिजे. तेव्हा विरोधी पक्षांची जवळ यायची प्रक्रिया सुरू होईल. काँग्रेसची दूरावस्था झाली असली तर तो पक्ष आजही रिलिव्हन्स असलेला पक्ष आहे. "

First published:
top videos

    Tags: Congress, Devendra Fadnavis, Sharad pawar