BREAKING : लॉकडाउन 4.0 मध्ये होणार मोठे बदल, 'या' मुद्यांवर राज्य सरकार घेणार निर्णय

BREAKING : लॉकडाउन 4.0 मध्ये होणार मोठे बदल, 'या' मुद्यांवर राज्य सरकार घेणार निर्णय

रेड झोन परिसरांत ही सध्याच्या नियमावलीत अजून काही बदल करण्यावर राज्य सरकारचा भर असल्याची माहिती समोर आली आहे.

  • Share this:

मुंबई, 16 मे : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आलं आहे. लॉकडाउनचा तिसरा टप्पा उद्या 17 तारखेला संपणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही तयारी केली आहे. मुंबई, पुणे, सोलापूर, मालेगाव, औरंगाबाद या महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे चौथा लॉकडाउन कदाचित महाराष्ट्रात रेड झोन परिसरात वाढण्याची शक्यता अधिक आहे. मात्र, राज्य सरकार ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये सध्या पेक्षा अजून शिथिलता आणण्याच्या विचारात आहे, अशी माहिती समोर आली आहे.

गेल्या दीड महिन्यांपासून लॉकडाउन असल्यामुळे राज्यासमोर आर्थिक अडचणीचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोन तयार करून अटी शिथील करण्यात आल्या होत्या. आता चौथ्या टप्प्यातील लॉकडाउनमध्येही राज्यात मोठे बदल होण्याची चिन्ह आहे. राज्यातील ग्रीन आणि ऑरेजं झोनमधील जिल्ह्यात अजून शिथिलता आणण्याच्या विचारात सरकारचा विचार आहे.

हेही वाचा - पुण्यात कोरोनाच्या धास्तीने 24 वर्षीय तरुणाची आत्महत्या, रिपोर्ट आला निगेटिव्ह

रेड झोन परिसरांत ही सध्याच्या नियमावलीत अजून काही बदल करण्यावर राज्य सरकारचा भर असल्याची माहिती समोर आली आहे. ग्रीन आणि ऑरेंज झोन भागात औद्योगिक तसंच इतर व्यवहारांवर अधिक शिथिलता देण्याबाबत सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे या भागात उद्योग धंदे सुरू झाले तर राज्यापुढे आर्थिक समस्या वेगळ्या वाढू नये यासाठी याबाबत विचार करत असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह काही कॅबिनेट मंत्र्यांची राज्यातल्या सद्यस्थितीवर चर्चा झाली. यात काही औद्योगिक क्षेत्र तसंच ग्रीन आणि ऑरेंज घेऊन क्षेत्रात दिलासा देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चौथा लॉकडाउनबाबत नेमकी काय भूमिका घेतात यावर राज्य सरकारची भूमिका अधिक स्पष्टपणे ठरवता येणार आहे, असंही पाटील यांनी सांगितलं.

हेही वाचा - मुंब्य्रात मांजरीमुळे तुफान हाणामारी, भांडण सोडवण्यास गेलेल्या पोलिसांवर दगडफेक

मुंबई, पुणे शहरी रेड झोन भागातून राज्यातील इतर ग्रामीण भागात जाणाऱ्या लोकांबद्दल चौथ्या लॉकडाउनमध्ये अधिक लक्ष ठेवण्यात येणार आहे. कारण, मुंबई आणि पुण्यातून इतर जिल्ह्यात गेलेल्या लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे त्या जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. हे निदर्शनास आल्यामुळे याबाबत योग्य खबरदारी कशी राखता येईल, याबद्दल निर्णय होण्याची शक्यता आहे.

तसंच ग्रामीण भागात हॉस्पिटल सोईसुविधा कमी असल्याने ग्रामीण भागात तसंच ग्रीन ऑरेंज झोन भागात रूग्ण संख्या आणि स्थलांतराने वाढणार नाही यावर सरकार अधिक लक्ष देणार आहे,अशी माहितीही पाटील यांनी दिली.

संपादन - सचिन साळवे

First published: May 16, 2020, 10:16 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading