मुंबई, 28 एप्रिल : राज्यात कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे अखेर महाविकास आघाडी सरकारने 18 ते 44 या वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत **(Free vaccination for Maharashtra citizens)**देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी याची घोषणा केली. ‘गेल्या वर्ष-सव्वा वर्षांपासून आपण कोविडची लढाई लढतो आहोत. जानेवारीपासून केंद्राच्या सहकार्याने राज्यात लसीकरण सुरू आहे. आजतागायत 45 च्या पुढील वयोगटातील दीड कोटीपेक्षा जास्त जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. हा देशात विक्रम आहे, असंही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
अत्यवस्थ रुग्णाला लावला रिकामा सिलेंडर, रुग्णालयाच्या दारातच रुग्णाचा तडफडून मृत
उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच इतर सर्व प्रमुख सहकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा झाली आहे. सध्या राज्यसमोर आर्थिक चणचण असूनही नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य आहे त्यामुळेच 18 ते 44 च्या वयोगटातील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून लसींचा पुरवठा कसा होतो, यानुसार लसीकरण नियोजन करून पुढील कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हणाले. ‘सध्या सिरम आणि भारत बायोटेक या कंपन्यांच्या लसी उपब्ध असून, त्यांच्याशी सातत्याने चर्चा करून, पाठपुराव्याने जास्तील जास्त लस उपलब्ध करून देण्यात येईल’, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
त्यानं रोजे सोडून हाती घेतंल लोकसेवेचं व्रत, कोरोना काळात फैजुल ठरतोय आदर्श
‘18 ते 44 वयोगटातील लसीकरण कार्यक्रमाचे नियोजन करताना कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी घेण्याची मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सूचना केली आहे. या वयोगटातील नागरिकांनी कोविन मोबाईल अॅपवर नोंदणी करावी, कुठेही लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये. लसीकरणाबाबत व्यवस्थित व सुस्पष्ट सूचना मिळतील. असेही मुख्यमंत्री म्हणाले.