मराठी बातम्या /बातम्या /देश /

त्यानं रोजे सोडून हाती घेतंल लोकसेवेचं व्रत, कोरोना काळात फैजुल ठरतोय आदर्श

त्यानं रोजे सोडून हाती घेतंल लोकसेवेचं व्रत, कोरोना काळात फैजुल ठरतोय आदर्श

हा युवक कोरोनाच्या कठीण काळात गरीब आणि इतर गरजूंना मदत करण्यातच व्यस्त आहे. त्याने कठीण समयी गरजूंना शववाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत. तसंच, अनाथ लोकांना खांदा देणं, त्यांचे अंत्यसंस्कार करणं यातही सहभागी होत आहे. फैजुल स्वत:ही गरीब कुटुंबातील आहे आणि केवळ माणुसकीच्या भावनेतून त्याने हा वसा घेतला आहे.

हा युवक कोरोनाच्या कठीण काळात गरीब आणि इतर गरजूंना मदत करण्यातच व्यस्त आहे. त्याने कठीण समयी गरजूंना शववाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत. तसंच, अनाथ लोकांना खांदा देणं, त्यांचे अंत्यसंस्कार करणं यातही सहभागी होत आहे. फैजुल स्वत:ही गरीब कुटुंबातील आहे आणि केवळ माणुसकीच्या भावनेतून त्याने हा वसा घेतला आहे.

हा युवक कोरोनाच्या कठीण काळात गरीब आणि इतर गरजूंना मदत करण्यातच व्यस्त आहे. त्याने कठीण समयी गरजूंना शववाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत. तसंच, अनाथ लोकांना खांदा देणं, त्यांचे अंत्यसंस्कार करणं यातही सहभागी होत आहे. फैजुल स्वत:ही गरीब कुटुंबातील आहे आणि केवळ माणुसकीच्या भावनेतून त्याने हा वसा घेतला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

प्रयागराज (उत्तर प्रदेश), 28 एप्रिल: कोरोना विषाणूमुळे जगभरात पसरलेल्या महामारीदरम्यान (Corona Pandemic) लोक आजाराचा संसर्ग होण्याच्या भीतीने एकमेकांपासून दूर राहत आहेत. अशात प्रयागराजमधील एक व्यक्ती अडचणीत सापडलेल्या आणि गरजू लोकांना मदत करत आहे. मुस्लीम समाजातील फैजुल अडल्या-नडलेल्यांसाठी देवदूत ठरला आहे.

मुस्लीम समाजात पवित्र समजल्या जाणाऱ्या रमजानच्या महिन्यात फैजुलने उपवास म्हणजे रोजे ठेवलेले नाहीत. हा युवक कोरोनाच्या कठीण काळात गरीब आणि इतर गरजूंना मदत करण्यातच व्यस्त आहे. त्याने कठीण समयी गरजूंना शववाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत. तसंच, अनाथ लोकांना खांदा देणं, त्यांचे अंत्यसंस्कार करणं यातही सहभागी होत आहे. फैजुल स्वत:ही गरीब कुटुंबातील आहे आणि केवळ माणुसकीच्या भावनेतून त्याने हा वसा घेतला आहे. त्याचं हे काम खरं तर, व्यवस्थेलाही आत्मचिंतन करायला लावणारं आहे.

प्रयागराजमधील अतरसुइया भागात राहणारा फैजुल गेल्या 10 वर्षांपासून गरीबांच्या मृतदेहांसाठी मोफत वाहनं उपलब्ध करून देत आहे. परंतु, कोरोनाच्या कठीण काळात त्याचा सर्व वेळ गरजूंना मदत करण्यात जात आहे. कोणी मदत मागण्यासाठी फोन केला, तर तेथे तो धावून जातो. स्वतःच्या वाहनाने रुग्णांना आणि मृतदेहांना इच्छित ठिकाणी पोहोचवलं जातं. त्याने कधीही कोणाला पैशासाठी अडवलं नाही. लोकांनी स्वेच्छेने दिलेल्या पैशांवर तो चालकाच्या पगाराचा खर्च आणि वाहनाची देखभालीचा खर्च चालवत आहे. कोरोना साथीच्या वेळी, जिथे लोकांना एकतर रुग्णवाहिका आणि मृतदेह मिळत नाहीत किंवा त्यासाठी त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा पैसे आकारले जात आहे. अशा परिस्थितीत फैजुल गरजूंसाठी देवदूतच ठरला आहे. सध्या कोरोना काळात सर्वजण स्वत:हून मदतीसाठी पुढे येण्यास नाखूष आहेत. मात्र, फैजुल यांनी गोर-गरीबांच्या सेवेचं व्रत घेतलं आहे.

(हे वाचा - साध्या सर्दी-तापाचा विषाणू करू शकतो कोरोनाव्हायरसचा खात्मा?)

दिवसातून पाच वेळा नमाज पढणाऱ्या फैजुलने यावेळी रोजा ठेवला नाही

फैजुल स्वतः खूप धर्मभोळा आहे. तो दररोज पाच वेळा नमाज पडतो. मात्र, यावेळी रमजानच्या महिन्यात त्याने रोजे ठेवलेले नाहीत. कामात कोणताही अडथळा येऊ नये, म्हणून यावेळी अल्लाहची क्षमा मागून त्यानी रोजे ठेवलेले नाहीत, असं त्याचं म्हणणं आहे. फैजुलने ‘मृतदेहांना मोफत वाहून नेणे’ यालाच आपल्या जीवनाचा उद्देश मानलं आहे. आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी त्याने लग्नही केले नाही. तो म्हणतो की, ऐहिकतेत अडकल्यामुळे त्याच्या कामात अडथळा येऊ नये,  म्हणून त्याला लग्न करण्याची इच्छा नाही. पूर्वी तो मृतदेह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हातगाडीतून घेऊन जायचा. पण नंतर काही संस्थांची मदत घेत काही पैसे गोळा करून त्याने वाहन खरेदी केलं.

फैजुलच्या सेवाभावाचं कौतुक -

फैजुलविषयी माहिती असणारे सर्वजण त्याच्या सेवाभावाने प्रभावित झाले आहेत. कोरोना कालावधीत किती लोक आपत्तीत संधी शोधत आहेत, हे फैजुलला ओळखणारे लोक सांगतात. औषधांपासून ते ऑक्सिजनपर्यंत अक्षरश: लूटालूट सुरू आहे. त्याच वेळी फैजुल देवदूत बनून लोकांच्या मदतीसाठी पोहोचत आहे. साथीच्या या लाटेत, नातेवाईकांच्या मृत्यूनंतर लोकांना मृतदेहावर अंत्यसंस्कारांसाठी कित्येक तास वाट पाहावी लागत आहे. पण फैजुल मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नेण्याची गरज असल्याची माहिती मिळताच तो लोकांच्या मदतीला धावून जात आहे. या कामापुढे फैजुल त्याच्या भूक - तहानेचीही पर्वा करत नाही.

(हे वाचा - Nagpur: ‘मी जीवन जगलो आहे, यांची मुलं अनाथ होतील..’ RSS स्वयंसेवकाने स्वत:च्या बेडचा केला त्याग, 3 दिवसांतच मृत्यूनं गाठलं)

कोरोना साथीच्या या कठीण काळात प्रयागराजमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत. मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी घाटांवर तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे. अशा वेळी फैजुलने मानवतेची मशाल हाती घेतली आहे. अशा परिस्थितीत इतर लोकांनीही फैजुलकडून प्रेरणा घेऊन मानवतेची सेवा केली पाहिजे. फैजुलचे काम आपत्तीत संधी शोधणाऱ्यांसाठी डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारे ठरलं आहे.

First published:

Tags: Corona, Corona virus in india, Covid19, UP, Uttar pradesh news