मराठी बातम्या /बातम्या /aurangabad /

अत्यवस्थ रुग्णाला लावला रिकामा सिलेंडर, रुग्णालयाच्या दारातच रुग्णाचा तडफडून मृत्यू

अत्यवस्थ रुग्णाला लावला रिकामा सिलेंडर, रुग्णालयाच्या दारातच रुग्णाचा तडफडून मृत्यू

औरंगाबादमधील एका रुग्णालयाबाहेर ऑक्सिजनची गरज असणाऱ्या एका रुग्णाला चक्क रिकामा सिलेंडर (conjoin empty cylinder to serious patient) लावल्याची घटना घडली आहे. त्यामुळे संबंधित रुग्णाचा रुग्णालयातील दारातचं तडफडून मृत्यू (patient death) झाला आहे.

पुढे वाचा ...

औरंगाबाद, 28 एप्रिल: औरंगाबादमधील घाटी रुग्णालयाबाहेर ऑक्सिजनची गरज असणाऱ्या एका रुग्णाला चक्क रिकामा सिलेंडर (conjoin empty cylinder to serious patient) लावल्याची घटना घडली आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्याच्या (Medical Staff) हजगर्जीपणामुळे संबंधित रुग्णाचा रुग्णालयातील दारातचं तडफडून मृत्यू (Petient death) झाला असा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

संबंधित घटना घाटी रुग्णालयाच्या दारात घडली आहे. याठिकाणी अत्यवस्थ असणाऱ्या एका रुग्णाला आणण्यात आलं होतं. संबंधित रुग्णाला ऑक्सिजनची आवश्यकता होती. त्यामुळे येथील कर्मचाऱ्याने गडबडीत एक रिकामा सिलेंडर लावला. त्यानंतर तीन सिलेंडर बदलण्यात आले, पण तीनही सिलेंडर रिकामेचं होते. बराच प्रयत्न केल्यानंतरही त्यांना ऑक्सिजनने भरलेला सिलेंडर सापडलाच नाही. त्यामुळे कॅज्युअल्टी कक्षाबाहेरच रूग्णाचा तडफडून मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे.

सराईत दरोडेखाराला मुंबईतून अटक; 4 वर्षांपूर्वी जेलची भिंत ओलांडून ठोकली होती धूम

सुनील मगरेअसं या मृत रुग्णांच नाव असून तो बापूनगर-खोकडपुरा येथील रहिवासी आहे. विशेष म्हणजे, मृत सुनील हे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते होते. संबंधित घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. सुनील मगरे यांचं पोट दुखत असल्यानं त्यांना बायजीपुरा येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. याठिकाणी दोन दिवस उपचार करण्यात आल्यानंतर त्यांना निमोनिया झाल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे मृत मगरे यांना रात्री आठ वाजता घाटी येथील रुग्णालयात जाण्यास सांगितलं.

हे ही वाचा-पोलिसांनी रात्रभर रोखून धरली ऑक्सिजन गाडी;प्राणवायू न मिळाल्यानं रुग्णाचा मृत्यू

दरम्यान घाटी रुग्णालयात गेल्यानंतर कॅज्युअल्टी बाहेर मगरे यांची तपासणी सुरू होती. त्यानंतर आयपीडीमध्ये दाखल करण्यासाठी त्यांना रूग्णवाहिकेत  हलवण्यात आलं. तत्पूर्वी सुनीलला तातडीनं ऑक्सिजनची गरज भासली. पण कर्मचाऱ्यांनी रिकामे सिलेंडर लावले. रिकाम्या सिलेंडरमुळे सुनीलला श्वास घेण्यास आणखी त्रास झाला. यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांन दुसरा सिलेंडर लावला तर तोही रिकामा निघाला.

दरम्यान, रूग्णाच्या नातेवाईकांनीच पळत जाऊन तिसरा सिलेंडर आणला. पण तोपर्यंत सुनीलचा तडफडून मृत्यू झाला होता. एका महिला कर्मचाऱ्याने त्याच्या मृत्यूनंतर पंपिंग सुरू केली. पण डॉक्टर कॅज्युअल्टीतून रूग्णवाहिकेपर्यंतही आले नाहीत, असा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. थोड्या वेळानं डॉक्टरांनी सुनीलला मृत घोषित केलं.

First published:

Tags: Aurangabad News, Crime, Patient death