मुंबई, 22 डिसेंबर: मुंबई महानगरपालिकेत (BMC)नोकरी (Job)मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल 500 जणांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. उमेदवारांना जवळपास 15 ते 20 कोटी रुपयांना गंडा घातलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आर्थिक फसवणूक (Fraud) झालेल्या काही तरुणांनी केलेल्या तक्रारीवरून सायन पोलिस ठाण्यात (Sion Police Station, Mumbai) गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार तपास केला असता आरोपींमध्ये मुंबई महापालिकेच्या माजी कर्मचारी त्याचबरोबर एक निवृत्त महिला पोलिस अधिकारी देखील सामील असल्याची माहिती समोर आली आहे. हेही वाचा… कोणाच्या पोटात दुखण्याचं कारण नाही, राम मंदिरावरून देवेंद्र फडवणीसांचा पलटवार प्रकाश सदाफुले आणि नितीन धोत्रे या दोघांनी एका महिलेला व तिच्या मुलाला महापालिकेत नोकरी लावतो, असे आमिष दाखवले होते. याकरता त्या महिलेकडून 4 लाख रुपये मागवण्यात आले होते. महिलेनं चार लाख रुपये जमवले प्रकाश सदाफुले आणि नितीन धोत्रे या दोघांनीही पैसे दिले पण पैसे देऊन बरेच दिवस उलटले तरी हे दोघे नोकरीबाबत काहीच बोलत नव्हते. महिला तगादा लावत असल्याचं पाहून प्रकाश आणि नितिन या दोघांनी महिला आणि तिच्या मुलाची नोकरी आधी वैद्यकीय तपासणी करावी लागेल, असं कारण सांगून दोघांची मुंबई महानगरपालिकेच्या एका रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करुन घेतली. जेणेकरुण मुंबई महानगरपालिकेनेच आपली वैद्यकीय तपासणी केली आहे, असं तिला भासवलं. यानंतर दोघांना प्रकाश आणि नितिने नियुक्तीपत्रे दाखवून पालिका मुख्यालयातून कामावर हजर राहण्याबाबत नंतर कळविण्यात येईल, असे सांगितले. आता आपल्या मुंबई महानगरपालिकेत नोकरी लागेल या आनंदात असलेल्या त्या महिलेनं पुन्हा काही दिवसांनी प्रकाश अणि नितिनला फोन केला असता दोघांनी पुन्हा उडवा उडवीची उत्तरे दिली. हेही वाचा… पुणे, ठाण्यासह अनेक महापालिका क्षेत्रात संचारबंदीचे आदेश लागू दोघांनी सांगितल्यानुसार संबंधित महिला आणि तिचा मुलगा महापालिका मुख्यालयातून फोन येण्याची वाट पाहत होते. बराच कालावधी उलटल्यानंतरही काहीच माहिती मिळत नसल्याने महिलेनं दोघांशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांनी दिलेले त्यांचे मोबाइल नंबर बंद येत होते. बरेच दिवस प्रयत्न करुनही प्रकाश आणि नितिन यांचे फोन लागत नव्हते. शेवटी त्या महिलेने आणि तिच्या मुलाने या दोघांचे घर शोधून काढलं. पण तेथे दोघे सापडले नाही मात्र आपली फसवणूक झाल्याचं महिलेच्या लक्षात आले. तिने थेट सायन पोलिस स्टेशन गाठून घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेत तपास केला असता ही धक्कादायक माहिती समोर आली. पोलीस सहआयुक्त (गुन्हे), मिलिंद भारांबे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) विरेश प्रभु, पोलीस उपआयुक्त (प्रकटीकरण) प्रकाश जाधव, यांच्या निगरणीखाली सहा.पो.आयुक्त, डी (विशेष), गुन्हे शाखा, शशांक सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक केदारी पवार, यांच्या नेतृत्वाखाली पो.नि. धिरज कोळी, सपोनि लक्ष्मीकांत सांळुखे, सुनिल माने, अमित भोसले, स.फौ. सुभाष काळे, पो.ह. राउत, पोना. भंडारे, अशोक सावंत, सुनिल कांगणे, शैलेंद्र धनावडे, अरूण सावंत, चिंतामण इरनक, विनोद पद्मन, अमित वसावे, पो.शि. विश्वनाथ पोळ, मंगेश जगझाप, अजित मोरे, धुळदेव कोळेकर, म.पोशि. निचिते, पाटील तसेच पोहचा पासी, पोनाचा जगदाळे, पोशिचा मुंकुदे, गायकवाड यांनी भरती घोटाळा उघडकीस आणला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.