मुंबई, 04 मार्च: महाराष्ट्रातील कोरोनाची आकडेवारी (Coronavirus Cases in Maharashtra) अतिशय चिंताजनक आहे. राज्यात लॉकडाऊन होणार की नाही, याचा निर्णय देखील लवकरच घेतला जाणार आहे. दरम्यान राज्यातील कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) कोरोना गाइडलाइन्सचं पालन न करणाऱ्यांना 1000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. विमानतळ प्रशासनाकडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, डायरेक्ट्रेड जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (Directorate General of Civil Aviation - DGCA)च्या निर्देशानुसार कोव्हिड-19 सुरक्षा प्रोटोकॉल (Covid-19 safety protocols) च्या नियमांचे पालन न करणाऱ्यांकडून 1000 रुपये दंड वसुल केला जाईल. हा नियम 1 एप्रिलपासून लागू करण्यात आला आहे.
(हे वाचा-प्राण्यांसाठी तयार झालेली जगातील पहिली कोरोना लस आहे तरी कशी?)
या निवेदनात पुढे असे नमुद करण्यात आले आहे की, जर एखाद्या प्रवाशाने तोंड आणि नाक झाकणारा मास्क घातला नाही तर तसंच सामाजिक अंतराच्या (Social Distancing) नियमांचे पालन न केल्यास प्रवाशाला 1000 रुपये दंड आकारला जाईल.
(हे वाचा-'मे' अखेरपर्यंत कोरोनाची स्थिती भयावह! संशोधनातून समोर आलं किती असेल रुग्णसंख्या)
कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या वाढत्या प्रकरणांमुळे डीजीसीएने महाराष्ट्र आणि इतर काही राज्यात इशारा दिला आहे. डीजीसीएच्या तपासणीत असे आढळून आले की काही विमानतळांमधील प्रवासी कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत नाही आहेत. अशा परिस्थितीत विमानतळांवर कडक कारवाई करण्याचा सल्ला DGCA ने दिला आहे. विमानतळावर कोव्हिड प्रोटोकॉलचे पालन न करणाऱ्या प्रवाशांना दंड ठोठावण्यात यावा, असे या नियामकाने म्हटले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona hotspot, Corona spread, Corona updates