नवी दिल्ली 04 एप्रिल : देशात कोरोना (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाचे (Corona) नवीन आकडे दररोज एक नवा उच्चांक गाठताना दिसत आहेत. कोरोना प्रसाराचा हा वेग पाहाता बंगळुरूमधील (Bengaluru) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सनं (IISC) असा अंदाज व्यक्त केला आहे, की मे महिन्याच्या अखेरपर्यंत हा आकडा 1.4 कोटीच्याही पुढे जाईल. कोरोनाच्या ट्रेंडवर नजर ठेवणाऱ्या शोधकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, एप्रिलच्या मध्यापर्यंत कोरोना आपल्या पिकवर असू शकतो आणि अॅक्टिव्ह केस 7.3 लाखापर्यंत जाऊ शकतात.
शोधकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, एप्रिल ते मे महिन्याच्या दरम्यान कोरोनाचा प्रसार अधिक वेगानं होईल. मेअखेरपर्यंत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 20 लाखाहून अधिक होईल. शोधकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, जर आतापासून लोकांनी कोरोना नियमांचं पालन केलं, मास्क लावलं सोशल डिस्टन्सिंगचे पालन केलं आणि लसीकऱणाची संख्या वाढवल्यास कोरोनाची वाढती संख्या आटोक्यात आणणं शक्य होईल.
IISC चे प्रोफेसर शशिकुमार यांनी सांगितलं, की आतापर्यंत आम्ही जो अंदाज लावला आहे, तो कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या ट्रेंडवर आधारित आहे. आमच्या अंदाजानुसार एप्रिल अखेरपर्यंतच रुग्णांची संख्या 10.7 लाखापर्यंत पोहोचेल.
एक दिवसात 90 हजारहून अधिक रुग्ण -
देशात कोरोनाची दुसरी लाट अत्यंत वेगानं पसरताना दिसत आहे. कोरोनाच्या भयावह स्थितीचा अंदाज याच गोष्टीवरुन लावला जाऊ शकतो की देशा एका दिवसात 90 हजारहून अधिक रूग्ण समोर येत आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशभरात शनिवारी कोरोनाचे 92,943 नवे रूग्ण समोर आले आहेत.
मुंबईत 9 हजारापेक्षा अधिक रूग्ण -
मुंबई शहरात कोरोनाचे 9,108 नवे रुग्ण समोर आले आहेत. याआधी 17 सप्टेंबर 2020 ला महाराष्ट्रात एका दिवसात सर्वाधिक 24,619 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. आरोग्य विभागानं म्हटलं, की 1,84,404 आणखी रुग्ण समोर आल्यानंतर महाराष्ट्रातील आतापर्यंतच्या कोरोना रुग्णांची संख्या 2,03,43,123 झाली आहे. विभागाच्या म्हणण्यानुसार, राज्याच्या रिकव्हरी रेट 84.49 टक्के असून मृत्यूदर 1.88 टक्के आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona spread, Corona virus in india