मुंबई, 07 जून: सोशल मीडियाला (Social Media) लगाम घालण्यासाठी मोदी सरकारने (Modi Government) कंबर कसली आहे. पण, 'ब्लू टीक' आणि लसीकरण यातील फरक पहिल्यांदा मोदी सरकारने समजून घ्यावा. 'ब्लू टीक' पेक्षा लोकांच्या लसीकरणाकडे जास्त लक्ष द्यावा, असा सणसणीत टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी भाजपला लगावला आहे.
मोदी सरकारने ट्वीटर, फेसबुकसह सर्वच सोशल मीडियासाठी नियमावली तयारी केली आहे. पण, यामुळे विरोधकांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उडवली आहे. 'ट्वीरवर संपूर्ण भाजप आणि केंद्र सरकार 'ब्लू टीक' ची लढाई लढताना दिसत आहे तर दुसरीकडे देशातील जनता लसीकरणाची लढाई लढत असल्याचं परखड मत नवाब मलिक यांनी व्यक्त केलं.
विराटसोबत छोले-भटूरे खाण्याची आहे 'या' ऑस्ट्रेलियन सुंदरीची इच्छा
तसंच, ट्वीटरवरील 'ब्लू टीक' असेल किंवा कोरोना काळातील लोकांचे लसीकरण असेल यावरून केंद्रसरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे मात्र याकडे दुर्लक्ष करून केंद्र सरकार आपल्याच अहंकारात मश्गुल असल्याची टीकाही नवाब मलिक यांनी केली.
...तोपर्यंत भाजपवाल्यांना गुदगुल्या होत होत्या -सेनेचा टोला
दरम्यान, मोदी सरकारने सोशल माध्यमांना लगाम घालण्यासाठी भारताचे नियम पाळण्यास बंधनकारक केले आहे. त्यावरून बराच वाद पेटला आहे. याच मुद्यावर शिवसेनेचे मुखपृष्ठ असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे.
पुण्यात संचारबंदीतही तळीरामांची चंगळ; घसा ओला करताना पोलिसांनी टाकली धाड
'उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यांच्या निवडणुका जिंकल्या व ते करताना राजकीय विरोधकांची यथेच्छ बदनामी करण्यात येत होती. त्या काळात राहुल गांधी यांना ज्या शब्दांत ट्विटर किंवा फेसबुकवर शिवराळ शब्द वापरले गेले ते कोणत्या नियमात बसले? मनमोहन सिंगांसारख्या ज्येष्ठ नेत्यास काय काय विशेषणे लावली? उद्धव ठाकरे यांच्यापासून ममता बॅनर्जी, शरद पवार, प्रियांका गांधी, मुलायम सिंग यादव अशा राजकारण व समाजकारणात हयात घालविलेल्या नेत्यांच्या विरोधात या ‘ट्विटर’ वगैरेंचा वापर करून बदनामी मोहिमा राबविल्या गेल्या. जोपर्यंत हे हल्ले एकतर्फी पद्धतीने सुरू होते तोपर्यंत भाजपवाल्यांना गुदगुल्या होत होत्या, पण आता त्यांच्या सायबर फौजांसमोर विरोधकांचे त्याच ताकदीचे सैन्य उभे करून हल्ले सुरू झाले तेव्हा भाजपच्या तंबूत घबराट झाली' अशी टीका सेनेनं केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra, Mumbai, NCP, भाजप