मुंबई, 7 जून: टीम इंडिया कॅप्टन विराट कोहलीचे (Virat Kohli) जगभर फॅन्स आहेत. विराटला भेटण्याची, विराटशी बोलण्याची त्यांची प्रचंड इच्छा असते. या फॅन्सच्या विराटकडून अनेक अपेक्षा असतात.ऑस्ट्रेलियन क्रिकेट अँकर क्लॉय अमांडा बेली (Chloe Amanda Bailey) ही देखील विराटची मोठी फॅन आहे. विराट आणि अनुष्कानं त्यांच्या मुलाला ऑस्ट्रेलियात जन्म द्यावा अशी अपेक्षा तिने यापूर्वी व्यक्त केली होती. त्याचबरोबर तिची विराटकडं आणखी एक अपेक्षा आहे. क्लॉयनं ट्विटरवर एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये लिहलं होतं की, “विराट कोहली हा माझा आवडता क्रिकेटपटू आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) माझी आवडती टीम आहे. महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) महान खेळाडू असून मी भारतामध्ये जाऊन छोले-भटूरे खाणार आहे.
To answer your most popular questions in one tweet:
— Chloe-Amanda Bailey (@ChloeAmandaB) December 13, 2020
My fave cricketer is Virat Kohli.
My fave IPL team is RCB.
MS Dhoni is a legend.
Yes I will visit India.
Yes I will have chole bhature😂
छोले-भटूरे ही विराट कोहलीची आवडती डिश आहे. विराटने यापूर्वी देखील त्याचा अनेकदा उल्लेख केला आहे. त्याच कारणामुळे क्लॉयला भारतामध्ये येऊन छोले- भटूरे खाण्याची इच्छा आहे. विराट कोहलीची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) ही क्लॉची आवडती आयपीएल टीम असून तिने यापूर्वी अनेकदा आरसीबीची जर्सी घालून टीमला पाठिंबा दिला आहे.
WTC 2021 Final : ‘फॉलो ऑन’च्या नियमाबाबत ICC ची मोठी घोषणा क्लॉय ही चॅनल 9 ची स्पोर्ट्स अँकर आहे. ती फिट राहण्यासाठी नियमित योगा करते. त्याचबरोबर तिला कुत्रेही खूप आवडतात.