Home /News /mumbai /

सुरतमधून निघतानाचा एकनाथ शिंदे यांचा पहिला व्हिडीओ समोर

सुरतमधून निघतानाचा एकनाथ शिंदे यांचा पहिला व्हिडीओ समोर

सुरतच्या ली मॅरेडियन हॉटेलमध्ये काही वेळापूर्वी तीन बसेस दाखल झाल्या होत्या. यातूनच आमदारांना एअरपोर्टपर्यंत नेण्यात आलं. बंडखोर आमदारांची पळवापळवी होऊ नये यासाठी त्यांना हलवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

    मुंबई, 22 जून : महाराष्ट्राच्या राजकारणात हादरवून सोडणाऱ्या घडामोडी सध्या घडत आहेत. शिवसेनेचे बंडखोर आमदार कुणाच्या संपर्कात येऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळेच सूरतमध्ये असलेल्या आमदारांना गुवाहाटी येथे हलवण्यात आलं आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसोबत सुरतमधून निघतानाचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे. सुरतच्या ली मॅरेडियन हॉटेलमध्ये काही वेळापूर्वी तीन बसेस दाखल झाल्या होत्या. यातूनच आमदारांना एअरपोर्टपर्यंत नेण्यात आलं. बंडखोर आमदारांची पळवापळवी होऊ नये यासाठी त्यांना हलवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय आमदारांचे नातेवाईकही त्यांना भेटायला येऊ शकतात. यासाठी सर्व बंडखोर आमदारांना हलवण्यात येणार आहे. सुरत एअरपोर्टवर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भाजपची अखेर एंट्री, एकनाथ शिंदेंसोबत दिसले भाजपचे २ नेते एकनाथ शिंदे आपल्यासह 33 आमदारांना घेऊन सुरतमध्ये दाखल झाले होते. पण सुरत हे मुंबईपासून जवळ असल्यामुळे मध्यरात्रीच गुवाहाटीला जाण्याचा प्लॅन रचला त्यानुसार मध्यरात्रीच सुरतमध्ये असलेल्या बंडखोर आमदारांना एअरलिफ्ट केल्याचं समोर आलं आहे. काही तासांपूर्वीच सुरतच्या विमानतळावर तीन स्पाइसजेटच्या विमानाने गुवाहाटीला रवाना झाले आहे. आमदारांपर्यंत कोणी पोहोचू नये यासाठी त्यांना सुरतहून आसामच्या गुवाहाटीमध्ये एअरलिफ्ट करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली होती. शिवसेनेच्या 5 बंडखोर आमदारांना सूरतमध्ये मारहाण? शिवसेनेचे बंडखोर आमदार सध्या सूरतच्या एका हॉटेलमध्ये आहेत. हे सर्व आमदार शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुजरातला गेले आहेत. या आमदारांमध्ये नितीन देशमुख यांचादेखील समावेश आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आमदार नितीन देशमुख यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप केला होता. त्यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेनेच्या पाच आमदारांना सूरतमध्ये मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पाचही आमदारांना महाराष्ट्र परत यायचं होतं. त्यातूनच त्यांना मारहाण करण्यात आल्याचा दावा केला जातोय.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Eknath Shinde, Shivsena

    पुढील बातम्या