Home /News /mumbai /

भाजपची अखेर एंट्री, एकनाथ शिंदेंसोबत दिसले भाजपचे २ नेते

भाजपची अखेर एंट्री, एकनाथ शिंदेंसोबत दिसले भाजपचे २ नेते

आमदारांपर्यंत कोणी पोहोचू नये यासाठी त्यांना सुरतहून आसामच्या गुवाहाटीमध्ये एअरलिफ्ट करण्यात आले आहे.

आमदारांपर्यंत कोणी पोहोचू नये यासाठी त्यांना सुरतहून आसामच्या गुवाहाटीमध्ये एअरलिफ्ट करण्यात आले आहे.

आमदारांपर्यंत कोणी पोहोचू नये यासाठी त्यांना सुरतहून आसामच्या गुवाहाटीमध्ये एअरलिफ्ट करण्यात आले आहे.

    मुंबई, 22 जून :शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी शिवसेनेचे आमदार फोडून मोठा राजकीय संघर्ष निर्माण केला आहे. ३३ आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी मोठ्या बंदोबस्तामध्ये मध्यरात्रीच गुवाहाटीला दाखल झाले आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत पडद्याआड असलेला भाजप आता समोर आला आहे. एकनाथ शिंदे आपल्यासह ३३ आमदारांना घेऊन सुरतमध्ये दाखल झाले होते. पण सुरत हे मुंबईपासून जवळ असल्यामुळे मध्यरात्रीच गुवाहाटीला जाण्याचा प्लॅन रचला त्यानुसार मध्यरात्रीच सुरतमध्ये असलेल्या बंडखोर आमदारांना गुवाहाटीला नेण्यात आलं आहे. आमदारांपर्यंत कोणी पोहोचू नये यासाठी त्यांना सुरतहून आसामच्या गुवाहाटीमध्ये एअरलिफ्ट करण्यात आले आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण आणि मोहित भारतीय सुद्धा सोबत होते. रवींद्र चव्हाण आणि मोहित भारतीय हे बंडखोर आमदारांसह गुवाहाटीला गेले होते. यावेळी माध्यमांशी बोलत असताना आपण आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचं हिंदुत्व सोडलं नाही. हेच हिंदुत्व घेऊन राजकारण करणार, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी नवीन इनिंग सुरू करण्याचे संकेत दिले आहे. गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदार यांची जबाबदारी संजय कुटे, मोहित खंबोज, डोंबिवली आमदार चव्हाण यांच्याकडे दिली आहे.या तीन लोकांवर सर्व समन्वय आणि सोबत राहण्याच्या सूचना केल्या आहेत. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी खास या तीन लोकांवर जबाबदारी दिली आहे.ऑपरेशन लोटस याची चर्चा रंगली आहे. कंबोज, कुटे आणि चव्हाण हे फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे शिंदे यांच्यासह इतर आमदार फडणवीस समवेत थेट संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज पहाटे सर्व आमदार हे गुवहाटीला पोहोचले आहे. गुवाहाटीमधील रेडिसन ब्लु या हॉटेलमध्ये या आमदारांना ठेवण्यात आले आहे. या हॉेटेलबाहेर मोठा सुरक्षा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. शिवसेनेच्या 5 बंडखोर आमदारांना सूरतमध्ये मारहाण? शिवसेनेचे बंडखोर आमदार सध्या सूरतच्या एका हॉटेलमध्ये आहेत. हे सर्व आमदार शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुजरातला गेले आहेत. या आमदारांमध्ये नितीन देशमुख यांचादेखील समावेश आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आमदार नितीन देशमुख यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप केला होता. त्यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेनेच्या पाच आमदारांना सूरतमध्ये मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पाचही आमदारांना महाराष्ट्र परत यायचं होतं. त्यातूनच त्यांना मारहाण करण्यात आल्याचा दावा केला जातोय. विशेष म्हणजे या मारहाणीची गंभीर दखल गृह खात्याकडून घेण्यात आली आहे. ज्या आमदारांना मारहाण झाली आहे त्या आमदारांच्या नातेवाईकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी नितीन देशमुख यांना मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तसेच आणखी दोन आमदारांना मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या