पोलीस स्टेशनसमोर अग्नितांडव, 32 मोटारसायकल आणि 3 चारचाकी वाहनं जळून खाक

पोलीस स्टेशनसमोर अग्नितांडव, 32 मोटारसायकल आणि 3 चारचाकी वाहनं जळून खाक

वाळीव पोलीस (Waliv Police Station) ठाण्यासमोर भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये 3 चारचारी वाहनं आणि 32 मोटारसायकल जळून खाक (Fire at Vasai) झाल्या आहेत.

  • Share this:

वसई, 14 मार्च: वाळीव पोलीस (Waliv Police Station) ठाण्यासमोर भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये 3 चारचारी वाहनं आणि 32 मोटारसायकल जळून खाक (Fire at Vasai) झाल्या आहेत. वाळीव पोलीस ठाण्यासमोरील जप्त केलेल्या  वाहनांना अचानक दुपारी 1 च्या सुमारास ही आग लागली. या आगीचे स्वरुप इतके भीषण होते की ही वाहनं जळून खाक (Four Wheeler and Bike set on Fire) झाली आहेत.

या आगीचा भीषण व्हिडीओ (Viral Video of Waliv Fire Station) देखील समोर आला आहे.आगीचे लोट यामध्ये वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहे. सध्या ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे.

आग विझवण्यासाठी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी धाव घेतली होती. याठिकाणी काही पोलिसांच्या गाड्या सुद्धा उभ्या होत्या, मात्र प्रसंगावधान राखत या गाड्यांना वाचवण्यात यश आलं आहे. पण आता या पोलीस ठाण्यातील जप्त वाहनांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नुकताच वसई पोलीस ठाण्यातील जप्त केलेली वाहने पोलिसांनी भंगारात विकल्याची माहिती समोर आली होती, अशावेळी ही आग लागली की लावली याचा पोलीस तपास करीत आहेत.

Published by: Janhavi Bhatkar
First published: March 14, 2021, 3:51 PM IST

ताज्या बातम्या