मुंबई, 16 फेब्रुवारी : रोज मरे त्याला कोण रडे अशी अवस्था मध्य रेल्वेची झाली आहे. आज आसनगाव रेल्वे स्थानकाजवळ लोकलमधून अचानक धूर निघू लागला. त्यामुळे घाबरलेल्या प्रवाशांनी मध्येच लोकल थांबवली आणि खाली उतरले. या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी आसनगाव स्थानकाजवळ अचानक लोकलमधून धूर निघायला लागला.
मुंबई - आसनगाव रेल्वे स्थानकाजवळ लोकलला आग लागल्याची घटना pic.twitter.com/8jNSbVg9TY
— News18Lokmat (@News18lokmat) February 16, 2023
मोठ्या प्रमाणात धूर येत असल्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. अनेक प्रवाशांनी लोकलमधून खाली उड्या टाकल्या. ब्रेकमध्ये घर्षण झाल्याने लोकलच्या चाकाला आग लागल्याचे समोर आले. त्यामुळे स्थानकावर एकच गोंधळ उडाला. अचानक काय झालं हे पाहण्यासाठी प्रवाशांनी लोकलमधून खाली उड्या टाकल्या. (बँकांनी जप्त केलेली घरे स्वस्त देण्याच्या बहाण्याने बंटी बबलीचा 157 जणांना चुना; नावे बदलून..) तेव्हा लोकलच्या चाकांना आग लागल्याचे लक्षात आले. त्यामुळे लोकांनी स्थानकाकडे धाव घेतली. बघता बघता संपूर्ण लोकल खाली झाली. लोकलच्या चााकांना आग लागल्याची माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. (मद्यपी कंटेनर चालकाने अनेक वाहनांना उडवले, एकाचा मृत्यू, पोलिसांनी अशाप्रकारे केली अटक) ऐन सकाळी चाकरमान्यांची कार्यालयाकडे जाण्यासाठी गर्दी असते. अशाच वेळी लोकलला आग लागल्यामुळे मोठा खोळंबा निर्माण झाला. रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन लोकलला लागलेली आग आटोक्यात आणली. त्यानंतर ही लोकल कारशेडकडे रवाना झाली.