जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मद्यपी कंटेनर चालकाने अनेक वाहनांना उडवले, एकाचा मृत्यू, पोलिसांनी अशाप्रकारे केली अटक

मद्यपी कंटेनर चालकाने अनेक वाहनांना उडवले, एकाचा मृत्यू, पोलिसांनी अशाप्रकारे केली अटक

कंटेनरचा पाठलाग करताना पोलीस

कंटेनरचा पाठलाग करताना पोलीस

चित्रपटापेक्षा थरारक घटना येवल्यात घडली.

  • -MIN READ Nashik,Maharashtra
  • Last Updated :

बब्बू शेख, प्रतिनिधी येवला (नाशिक), 16 फेब्रुवारी : येवल्यात अनेक गाडयांना उडवून कंटेनरचालक कंटनेर पळवून नेत होता. यावेळी जीव धोक्यात घालून पोलिसांनी तब्बल 20 किमीपर्यंत कंटेनरचा करण्यात आला. यानंतर मनमाडच्या अंकाईजवळ हा कंटेनर पलटी झाला. अपघात करून एखादे वाहन पळून जाताना त्याचा पोलीस आणि पब्लिक पाठलाग करून त्याला पकडतात, असे दृश्य आपण अनेक चित्रपटात पहिले आहे. मात्र, चित्रपटापेक्षा थरारक घटना येवल्यात घडली. भरधाव वेगाने जाणाऱ्या एका कंटेनरने अनेक दुचाकी, चार चाकींना उडवत पळून जाताना पोलीस आणि काही धाडसी तरुणांनी जीव धोक्यात घालून त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. या कंटेनरचा चालक मध्यधुंद अवस्थेत होता. त्याने कोपरगाव पासून हैदोस घालण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर हा कंटेनर येवल्यात दाखल झाला आणि त्याने विंचूर चाफुलीवर अनेक वाहनाना उडविले. या अपघातात सुमारे 10 ते 12 जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. जीव वाचविण्यासाठी रस्त्यावरील लोक सैरावैरा पळत सुटले होते. हेही वाचा -  Beed News : लग्नामध्ये गर्दीचा फायदा घेऊन चोरी, टोळी CCTV कॅमेऱ्यात कैद, एका मुलीचाही समावेश भीषण अपघात करून देखील चालक थांबला नाही. तो सुसाट वेगाने मनमाडच्या दिशेने निघाला होता. त्याला पकडण्यासाठी पोलीस आणि काही तरुणांनी तब्बल 20 किमीपर्यंत त्याचा पाठलाग केला. अखेर मनमाडच्या अंकाईजवळ हा कंटेनर पलटी झाल्यामुळे थांबला. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेऊन येवला पोलीस स्टेशनला घेऊन आले. जर कंटेनर पलटी झाला नसता आणि तो मनमाड शहरात दाखल झाला असताना तर येवल्यापेक्षा जास्त नुकसान येथे होऊन कदाचित अनेकांचा बळी गेला असता. मात्र, सुदैवाने पुढील अनर्थ टळला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात