मुंबई, 15 फेब्रुवारी : बँकांनी सिल केलेली घरे स्वस्त दरात देण्याच्या बहाण्याने कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या बंटी बबली टोळीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. मुंबई, ठाणे आणि वसई विरारमधील घराचे स्वप्न पाहणाऱ्या कित्येक नागरिकांना या जोडप्याने चुना लावला आहे. विशेष म्हणजे 2 जणांनी वकिलीच शिक्षण पूर्ण केल असून एकजण मुंबईच्या कोर्टात वकिली करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
परवेज आणि हिनाची जोडी अर्थात बंटी बबली या जोडगोळीने वसई विरार, ठाणे आणि मुंबई परिसरात राहणाऱ्या स्वस्त घराचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांना बँकेने सील केलेले रूम स्वस्त दारात विक्री करतो, असे सांगून आता पर्यंत 157 लोकांची 3.75 कोटींची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
परवेज शेख याने वकिली शिक्षण पूर्ण केले आहे. तो काहीदिवस बँकिंग हौसिंग क्षेत्रात काम करीत होता. त्यामुळे त्याने बँकांचे लिलावात काढण्यात येणारे घरे याची माहिती कशी घ्यायची याची पूर्ण कल्पना आली होती. त्या दरम्यान परवेज आणि हिना यांची ओळख झाली आणि ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. टोळीतील आणखी एक सदस्य साहेब शेख हा वकील असून तो मुंबईच्या कोर्टात वकिली करतो. त्यांनी एकत्र मिळून बँकांनी सील केलेली घरे स्वस्तात देण्याचा बहाणा करून लोकांना लुटण्याचा प्लान आखला. त्यांनी ठाण्यात "लॅन्ड लेंडर" नावे कंपनी स्थापन करुन जी.बी. रोड कापुरबावडी, जि. ठाणे येथील सुमारे 40 नागरीकांची 1.20 कोटींची फसवणूक केली. तर “पाटील डिजीटल" नावे कंपनी स्थापन करुन आझाद मैदान, मुंबई येथील सुमारे 72 नागरीकांची 1.75 तर विरारमध्ये "बिडर्स विनर्स" कंपनी स्थापन करून 80 लाखांची फसवणूक केली.
वाचा - स्वत:च्या दोन मुलांची निर्दयी आईकडूनच हत्या, धक्कादायक कारण समोर
विरार मधील "बिडर्स विनर्स" बोगस कंपनी स्थापन करून बोगस नावे परिधान केली. प्रविण मल्हारी ननवरे, नितीन शर्मा, राहुल भट, अलायदा शहा यांना बँकेने लिलावात काढलेली 4 घरे एन.पी.ए. तत्वावर स्वस्तात तडजोडीअंती विकण्याचे अमिष दाखवुन मोबाईल बंद करून फरार झाले होते. याबाबत अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. मात्र, 1 वर्ष झाले तरी काहीच होत नसल्याने पियुषकुमार दिवाण यांनी वरिष्ठांची भेट घेतल्यानंतर पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, पोलीस आयुक्त अमोल मांडवे मार्गदर्शनाखाली या टोळीचा पर्दाफाश करण्यात यश आलं आहे.
पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
या चारही आरोपींनी तिन्ही वेळा आपली नावे बदलून गुन्हा केला होता. परवेज दस्तगीर शेख (वय 31) हा मिरारोडचा राहणारा आहे. त्याने राहुल भट, पिटर सिकवेरा, आसिफ सैय्यद अशी नावे धारण केली होती. साहेब हुस्सेन शेख (वय 28) हा भाईंदरचा आहे. पेशाने वकील असून त्याने नितीन शर्मा, प्रशांत बन्सल, सोहल शेख अशी नावे धारण केली होती. प्रविण मल्हारी ननावरे हा खारेगाव, कळवा येथील असून त्याच्या कागदपत्रांचा वापर करून ही फसवणूक करण्यात आली. हिना इकबाल चुडेसरा ही काशिमिरा येथील असून तिने अलायदा शहा, हिना सैय्यद अशी नावे धारण केली होती. त्यांनी वेगवेगळ्या बोगस कंपन्या स्थापन करुन बँकांनी लिलावात काढलेली प्रापर्टी घरे स्वस्त दरात तडजोडीने मिळवून देण्याचा बहाणा करुन वसई, विरार, मुंबई शहर व ठाणे शहर परिसरातील 157 नागरीकांची 3.75 कोटी रुपयांची फसवणुक केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Mumbai police