मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

शिवसेना भवनासमोर भाजप आणि शिवसैनिकांमध्ये राडा, LIVE VIDEO

शिवसेना भवनासमोर भाजप आणि शिवसैनिकांमध्ये राडा, LIVE VIDEO

'भाजपच्या कार्यकर्त्यांनी विनाकारण आंदोलन केले होते, त्यांनी शिवसेनेच्या भवनावर जाण्याचा प्रयत्न केला'

'भाजपच्या कार्यकर्त्यांनी विनाकारण आंदोलन केले होते, त्यांनी शिवसेनेच्या भवनावर जाण्याचा प्रयत्न केला'

'भाजपच्या कार्यकर्त्यांनी विनाकारण आंदोलन केले होते, त्यांनी शिवसेनेच्या भवनावर जाण्याचा प्रयत्न केला'

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 16 जून : मुंबईतील (Mumbai)दादर  (Dadar)परिसरातील शिवसेना भवनासमोर (Shivsena Bhavan) शिवसैनिक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा पाहण्यास मिळाला. अयोध्येतील राम मंदिराच्या ट्रस्टने जमीन घोटाळा (ayodhya ram mandir land scam) प्रकरणावरून सामनाच्या अग्रलेखाचा निषेध करण्यासाठी भाजपने फटकार मोर्चा काढला होता. यावेळी शिवसैनिक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच धुमश्चक्री उडाली.

भाजपचे युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चेकरी जमा झाल्यानंतर शिवसैनिकांनी शिवसेना भवनाच्या परिसरात गर्दी केली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी शिवसेनेचे नेते सदा सरवणकर आणि इतर शिवसैनिक हजर होते. पोलिसांनी दोन्ही कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले होते. पण, दोन्ही बाजूने घोषणाबाजी झाल्यामुळे एकच गोंधळ उडाला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आणि शिवीगाळ केली असा आरोप केला आहे. पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते आणि व्हॅनमधून नेत होते, त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ केली असा आरोप शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी केला.

गल्लीतल्या पोरांसारखे भांडले पाकिस्तानचे खेळाडू, मैदानातच एकमेकांना नडले, VIDEO

तर, भाजपच्या कार्यकर्त्यांनी विनाकारण आंदोलन केले होते, त्यांनी शिवसेनेच्या भवनावर जाण्याचा प्रयत्न केला. जर कुणी शिवसेना भवनात घुसण्याचा प्रयत्न करणार असेल तर शिवसैनिक आपल्या स्टाईलने उत्तर देईलच, ही त्यांची भावना आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिली.

तर भाजपचे कार्यकर्ते हे शांतपणे आंदोलन करत होते. सामनामध्ये लिहिलेल्या अग्रलेखाच्या विरोधात शांतपणे आंदोलन करण्यात येत होते, पण शिवसैनिकांनीच कार्यकर्त्यांवर हल्ला केला, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला.

First published:

Tags: Samana, Shivsena, अयोध्या, सामना