मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Mumbai: LLB अर्धवट सोडून सुरू केला भलताच उद्योग; 12 महिलांना जाळ्यात ओढणारा भामटा जेरबंद

Mumbai: LLB अर्धवट सोडून सुरू केला भलताच उद्योग; 12 महिलांना जाळ्यात ओढणारा भामटा जेरबंद

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Crime in Mumbai: ऑनलाईन मॅट्रीमोनिअल साईटवरून (matrimonial site) महिलांना लग्नाचं आमिष (Lure of marriage) दाखवून त्यांची आर्थिक लूट (Financial fraud) करणाऱ्या एका भामट्याला मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं अटक केली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 05 डिसेंबर: ऑनलाईन मॅट्रीमोनिअल साईटवरून (Online matrimonial site) महिलांना लग्नाचं आमिष (Lure of marriage) दाखवून त्यांची आर्थिक लूट (Financial fraud) करणाऱ्या एका भामट्याला मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं अटक (Accused arrested) केली आहे. गेल्या आठ वर्षांपासून आरोपीचा हा उद्योग सुरू होता. दरम्यानच्या काळात आरोपीनं तब्बल 12 महिलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे. आरोपीनं आणखी बऱ्याच महिलांची फसवणूक केली असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.

सतीश गरुड असं अटक केलेल्या भामट्या तरुणाचं नाव आहे. आरोपी सतीश गरुड हा क्रिमिनल सायकोलॉजी आणि एल एल बीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. पण त्याने शेवटच्या वर्षाची परीक्षा न देता आपलं शिक्षण अर्धवट सोडलं आहे. त्याने आपल्या ज्ञानाचा आणि बुद्धीचा वापर महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी केला आहे. आरोपीनं आतापर्यंत लग्नाचं आमिष दाखवून तब्बल 12 महिलांची फसवणूक केली आहे. आरोपीनं पीडित महिलांकडून लाखो रुपये लाटल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे.

हेही वाचा-गोड बोलून घरी नेलं अन्..; कोल्हापुरात जावयानं सासऱ्याचा खून करून दगडाखाली गाडलं

आरोपी सतीश गरुड हा ऑनलाईन मॅट्रीमोनिअल साईटवरून 30 वर्षांपुढील महिलांना टार्गेट करत होता. तसेच काही घटस्फोटीत महिलांना देखील आरोपीनं आपल्या जाळ्यात ओढलं आहे. अशाच महिलांना हेरून आरोपी त्यांची फसवणूक करायचा. 2013 पासून आरोपीनं हा उद्योग सुरू केला होता. आरोपी अत्यंत गोड बोलून महिलांना आपल्याकडे आकर्षित करायचा. त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर त्यांची लुबाडणूक करायचा.

हेही वाचा-3वर्षीय बहिणीसोबत भावाचं घृणास्पद कृत्य; YouTube व्हिडीओ पाहून द्यायचा नरक यातना

इंटरनेटचा वापर वाढल्यानंतर अनेकजण सध्या मॅट्रिमोनिअल साईटचा वापर लग्न जुळवण्यासाठी करत आहेत. त्यामध्ये महिलांची फसवणूक होण्याचे प्रमाण देखील वाढलं आहे. त्यामुळे मॅट्रिमोनिअल साईटवरून लग्न जुळवणी करत असताना, सावध राहण्याची गरज आहे, असं आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आलं आहे. आरोपी सतीश गरुड हा पोलिसांच्या ताब्यात असून पोलिसांकडून त्याची कसून चौकशी केली जात आहे.

First published:

Tags: Crime news, Financial fraud, Mumbai