मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

Pune: पतीने केलेला अपमान लागला जिव्हारी; विवाहितेनं खाल्ल्या ‘थायरॉईड’च्या 50 गोळ्या

Pune: पतीने केलेला अपमान लागला जिव्हारी; विवाहितेनं खाल्ल्या ‘थायरॉईड’च्या 50 गोळ्या

Crime in Pune: पुण्यानजीक असणाऱ्या पिंपरी येथे एका विवाहितेनं 'थायरॉईड'च्या तब्बल 50 गोळ्या खाल्ल्याची (married woman took 50 thyroid tablets) घटना समोर आली आहे.

  • Published by:  News18 Desk
पिंपरी, 05 डिसेंबर: पुण्यानजीक असणाऱ्या पिंपरी येथे एका विवाहितेनं 'थायरॉईड'च्या तब्बल 50 गोळ्या खाल्ल्याची घटना (married woman took 50 thyroid tablets) समोर आली आहे. पतीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून (wife harassment by husband) पीडित महिलेनं 'थायरॉईड'च्या 50 गोळ्या खात आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. ही संतापजनक घटना समोर आल्यानंतर, पतीविरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR lodged) करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. अमोल मारुती भंडारे असं गुन्हा दाखल झालेल्या 37 वर्षीय आरोपी पतीचं नाव असून तो चिखली येथील साने चौक परिसरातील रहिवासी आहे. या प्रकरणी 31 वर्षीय विवाहितेनं चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. आरोपी पती अमोल याने सप्टेंबर 2015 ते 2 डिसेंबर 2021 या कालावधीत फिर्यादीला विविध कारणांसाठी त्रास दिला आहे. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर फिर्यादीनं थायरॉईड आजारावरील पन्नास गोळ्या खाल्ल्या आहेत. हेही वाचा-LLB अर्धवट सोडून सुरू केला भलताच उद्योग; 12 महिलांना जाळ्यात ओढणारा भामटा जेरबंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती अमोल याने घराचं आणि चारचाकी वाहनाचं कर्ज फेडण्यासाठी विवाहितेकडे पैशांची मागणी केली होती. त्यासाठी आई वडिलांकडून पैसे आणण्यासाठी विवाहितेवर दबाव टाकला जात होता. पण विवाहितेनं माहेरहून पैसे न आणल्याने आरोपी पती माहेरच्या लोकांच्या नावाने शिवीगाळ करत फिर्यादीला टोमणे मारत होता. तसेच तिला दमदाटी करत पैसे आणण्यासाठी छळ केला जात होता. गेल्या बऱ्याच काळापासून फिर्यादीला पतीकडून मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात होता. हेही वाचा-गोड बोलून घरी नेलं अन्..; कोल्हापुरात जावयानं सासऱ्याचा खून करून दगडाखाली गाडलं एवढंच नव्हे तर, आरोपी पती दारू पिऊन रात्री अपरात्री घरी येत पीडितेला मारहाण करायचा. तसेच तिला उपाशीपोटी झोपवायचा. आरोपी पतीच्या अमानुष त्रासाला कंटाळून फिर्यादी महिलेनं गुरुवारी थायरॉईड आजारावरील 50 गोळ्या खाल्ल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. या प्रकरणी चिखली पोलिसांनी कौटुंबीक हिंसाचारासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
First published:

Tags: Crime news, Pune

पुढील बातम्या