मुंबई, 7 जुलै : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे निकतवर्तीय प्रवीण परदेशी (Pravin Pardeshi) पुन्हा अॅक्टिव्ह मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत प्रवीण परदेशी सहभागी झाले होते. एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदार गोव्याला थांबले होते.
तेथील हॉटेलमध्येही प्रवीण परदेशींना पाहण्यात आलं होतं. फडणवीसांच्या जवळचे अधिकारी म्हणून परदेशींकडे पाहिलं जात होतं. मात्र ठाकरे सरकार येताच प्रवीण परदेशींना मुंबई पालिका आयुक्त पदावरून मे 2020 मध्ये हटवलं होतं. त्यानंतर परदेशी थेट केंद्रीय कमिट्यांमध्ये सक्रीय होते. प्रवीण परदेशी नोव्हेंबर २०२१ मध्ये केद्रींय कमिटीतून निवृत्त झाले आणि थेट आजच्या बैठकीत परदेशींच्या एन्ट्रीनं सर्वच जणं आश्चर्यचकीत झाले.
गोव्यात बंडखोर आमदारांच्या भेटीसाठीही प्रवीण परदेशी गेले होते. तेव्हाही त्यांच्या या सदिच्छा भेटीची चर्चा होती. प्रवीण परदेशी यांनी मे २०१९ मध्ये मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला होता. त्याही आधी प्रवीण परदेशी यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहिलं होतं. परदेशी यांनी त्यांच्या ३० वर्षांहून जास्त कार्यकाळात लातूर तसंच सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणूनही काम पाहिलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.