Home /News /mumbai /

अहो, बस्सा हो! फडणवीसांनी हात धरून शिंदेंना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवले, VIDEO

अहो, बस्सा हो! फडणवीसांनी हात धरून शिंदेंना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवले, VIDEO


एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री म्हणून मंत्रालयात पोहोचले

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री म्हणून मंत्रालयात पोहोचले

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री म्हणून मंत्रालयात पोहोचले

    मुंबई, ०७ जुलै : राजकीय घडामोडीनंतर मुख्यमंत्रिपदाची माळ एकनाथ शिंदे (eknanth shinde) यांच्या गळ्यात पडली. खुद्ध भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनीच याबद्दल घोषणा केली होती. अखेर आज एकनाथ शिेंदे यांनी मंत्रालयामध्ये कारभार स्विकारला. यावेळी फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचा हात धरून खुर्चीवर बसवले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री म्हणून मंत्रालयात (mumbai mantralaya) पोहोचले. आज त्यांचा मंत्रालयातला पहिलाच दिवस आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजपचे नेते पोहोचले होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी फडणवीस यांचा शाल देऊन सत्कार केला. त्यानंतर फडणवीस यांनी शिंदे यांना आता मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीमध्ये विराजमान होण्याचे सांगितले. पण, मुख्यमंत्री शिंदे यांनी आधी तुम्ही बसा असा आग्रह करत होते. त्यानंतर फडणवीस यांनी शिंदे यांचा हात धरला आणि मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवले. यावेळी सर्वांनी टाळ्या वाजून सर्वांनी अभिनंदन केलं. त्यानंतर फडणवीस यांनी टेबलवर असलेला पेपर शिंदे यांच्यासमोर ठेवला आणि सही करण्यास सांगितले. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री फडणवीसही शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच मंत्रालयात आले आहे. त्यामुळे आजपासून शिंदे आणि फडणवीस सरकारच्या कारभाराला अधिकृतरित्या सुरुवात झाली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कुटुंबीय मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयात आले आहे. मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, सूनबाई वृषाली शिंदे आणि नातू सुद्धा आला आहे. मुळात शिंदे कुटुंबासाठी आजचा दिवस आभाळा एवढा मोठा आहे.एकनाथ शिंदे यांनी संघर्षातून मोठे यश मिळवले आहे. शिवसेनेचा कार्यकर्त्या, पालिकेचे गटनेता, आमदार, मंत्री आणि आता मुख्यमंत्रिपद मिळावले आहे. त्यामुळे शिंदे कुटुंबांसाठी आज हा आनंदाचा क्षण आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो लावण्यात आला आहे. तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचाही फोटो लावला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या