Home /News /mumbai /

फडणवीस उपमुख्यमंत्री! मुंबई कार्यालय ते नागपूरपर्यंत भाजपच्या पोस्टर्सवरुन अमित शहाच गायब!

फडणवीस उपमुख्यमंत्री! मुंबई कार्यालय ते नागपूरपर्यंत भाजपच्या पोस्टर्सवरुन अमित शहाच गायब!

देवेंद्र फडणवीसांचे पंख कोणी कापले? फडणवीसांना दाबण्याचा प्रयत्न केला जातोय का असाही सवाल उपस्थित केला जाऊ लागला.

    मुंबई, 1 जुलै : गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदी आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदी विराजमान होतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र प्रत्यक्षात पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित केलं. स्वत: मात्र मंत्रिमंडळातही नसणार असल्याचं सांगितलं. यानंतर अनेकांच्या चेहऱ्याचा रंगच बदलला होता. मात्र काही वेळानंतर भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्रिपदी राहण्याचे आदेश दिले, यानंतर मात्र अनेकांना धक्का बसला होता. देवेंद्र फडणवीसांचे पंख कोणी कापले? फडणवीसांना दाबण्याचा प्रयत्न केला जातोय का असाही सवाल उपस्थित केला जाऊ लागला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिल्लीतून फडणवीसांनी मंत्रिमंडळामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले. थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडून देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी व्हावे असे ट्विट करत मंत्रिमंडळामध्ये सहभागी होण्यास भाग पाडले. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांचा शपथविधी पार पाडला. या सर्व प्रकरणात अमित शहांचा हात असल्याची चर्चा आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले, मात्र प्रत्यक्षात त्यांना उपमुख्यमंत्रिपदी नेमल्याने फडणवीस समर्थक नाराज झाल्याची चर्चा आहे. आज भाजपकडून मुंबई कार्यालयात जल्लोष करण्यात आला, पण या ठिकाणी लावण्यात आलेल्या फलकांवरून अमित शहा गायब असल्याचे दिसून आले. त्यानंतर नागपूरमध्येही माजी महापौर संदीप जोशी यांनी लावलेल्या फलकावरून अमित शाह गायब होते. कधी नव्हे ते अमित शाहांचा फोटो बॅनर करून गायब झाल्याने भाजपमधील नाराजी समोर आली आहे.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Amit Shah, BJP, Devendra Fadnavis, Mumbai

    पुढील बातम्या