जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / 'त्या' 12 आमदारांची नावे अन् निर्णयही गुलदस्त्यातच, आता शिंदे सरकार पाठवणार राज्यपालांकडे नवी यादी .

'त्या' 12 आमदारांची नावे अन् निर्णयही गुलदस्त्यातच, आता शिंदे सरकार पाठवणार राज्यपालांकडे नवी यादी .

'त्या' 12 आमदारांची नावे अन् निर्णयही गुलदस्त्यातच, आता शिंदे सरकार पाठवणार राज्यपालांकडे नवी यादी  .

विशेष म्हणजे त्यांच्या यादीवर राज्यपाल किती दिवसात निकाल देतात हेदेखील पाहायलं हवं.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 1 जुलै : महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्याच्या वर्षभरानंतर विधान परिषदेतील जागांसाठी 12 सदस्यांच्या नावाची यादी राज्यपालांकडे पाठवली होती. पण गेल्या दीड वर्षांपासून राज्यपालांनी यादीवर कोणताही निर्णय घेतला नाही. आता नव निर्वाचित राज्य सरकार 12 आमदारांची नवीन यादी राज्यपालांना पाठवणार येणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे पहिल्या यादीतील सर्व उमेदवारांची नावेही समोर आली नव्हती. त्याशिवाय या यादीतून एकनाथ खडसे, सचिन सावंत, विजय करंजकर यांनी नावं वगळण्यात येणार असल्याचं सांगितलं जात होतं. आता शिंदे सरकार कोणत्या उमेदवारांची नावं पुढे करतात हे पाहणं औत्युक्याचं ठरेल. विशेष म्हणजे त्यांच्या यादीवर राज्यपाल किती दिवसात निकाल देतात हेदेखील पाहायलं हवं. देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज लगेच कामाचा धडाका लावला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते अ‍ॅक्शन मोडमध्ये (Devendra Fadnavis on action mode) आले. देवेंद्र फडणवीस यांनी आज उपमुख्यमंत्रिपदाचा कारभार स्वीकारला. ते आज मंत्रालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. संबंधित बैठक ही ओबीसी आरक्षणासंदर्भात होती. ओबीसी आरक्षणासाठी तातडीने कारवाई करावी. त्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व काही करावं, अशा प्रकारच्या सूचना देवेंद्र फडणवीस यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीला भाजप नेते प्रवीण दरेकर, संजय कुटे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव उपस्थित होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात