मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

राजभवनाबद्दल भुताटकी शब्द वापरणे हा पोरखेळपणा, फडणवीसांचा राऊतांवर पलटवार

राजभवनाबद्दल भुताटकी शब्द वापरणे हा पोरखेळपणा, फडणवीसांचा राऊतांवर पलटवार

'नामनिर्देशित सदस्यांचा प्रकरण गंभीर विषय आहे, तो न्यायप्रविष्ट ही आहे त्या विषयाबद्दल असे वक्तव्य करणे'

'नामनिर्देशित सदस्यांचा प्रकरण गंभीर विषय आहे, तो न्यायप्रविष्ट ही आहे त्या विषयाबद्दल असे वक्तव्य करणे'

'नामनिर्देशित सदस्यांचा प्रकरण गंभीर विषय आहे, तो न्यायप्रविष्ट ही आहे त्या विषयाबद्दल असे वक्तव्य करणे'

  • Published by:  sachin Salve

नागपूर, 24 मे: राज्यपाल नियुक्त आमदारांची (MLAs appointed by Governor) यादी राज्यपालांकडे (Governor Bhagat Singh) नसल्याची माहिती समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांचा विषय न्याप्रविष्ट आहे, असं भुताटकी सारखे शब्द वापरणे हा पोरखेळ आहे, असा पलटवार भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर केला.

राज्यपाल नियुक्त यादी राजभवनावरून गहाळ झाल्याची माहिती समोर आल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून सडकून टीका केली होती. त्यांच्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी जशास तसे उत्तर दिले.

Alert! तुम्हीही Domino’sमधून ऑर्डर केलाय पिझ्झा? बँक अकाउंट धोक्यात,पाहा डिटेल्स

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी गायब झाली का या संदर्भात राजभवनच सांगू शकतो. पण नामनिर्देशित सदस्यांचा प्रकरण गंभीर विषय आहे, तो न्यायप्रविष्ट ही आहे त्या विषयाबद्दल असे वक्तव्य करणे, फाईल गायब झाली असे म्हणत भुताटकी सारखे शब्द वापरणे हे पोरखेळ आहे, असे कोणी ही करू नये, अशी टीका फडणवीस यांनी केली.

'मराठा आरक्षणाच्या विषयावर छत्रपती संभाजीराजे यांच्याशी मी पण भेट घेणार आहे, आमचे बोलणे झाले आहे. 28 तारखेला आमची भेट होणार आहे' अशी माहितीही फडणवीस यांनी दिली.

काय म्हणाले होते राऊत?

'महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने 12 सदस्यांची शिफारस विधान परिषदेवर नामनियुक्त करण्यासाठी केली. या शिफारशीस सहा महिने उलटून गेले. राज्यपाल निर्णय घेण्यास तयार नाहीत. यावर मुंबई हायकोर्टाने राज्यपालांना जाब विचारला आहे. ही 12 जणांच्या नावांची शिफारस केलेली ‘यादी’ असलेली फाईल राज्यपाल सचिवालयातून अदृश्य झाल्याचे समोर आले आहे. माहितीच्या अधिकारात अनिल गलगली यांनी याबाबतीत माहिती मागवली, तेव्हा अशी कोणती यादी किंवा फाईलच उपलब्ध नसल्याने कसली माहिती देणार?

corona भारतात 'मिक्स अँड मॅच' कोरोना लसीवर विचार सुरू, चाचण्यांत चांगले संकेत

असे राज्यपालांच्या कार्यालयाने कळवले. हा तर धक्कादायक वगैरे प्रकार नसून सरळ भुताटकीचाच प्रकार आहे. फार तर त्यास गूढ गौप्यस्फोट म्हणता येईल. महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आहे. त्यात भूत, प्रेत, देव, देवस्कीला थारा नाही. तरीही मुख्यमंत्र्यांनी पाठवलेली एक महत्त्वाची फाईल सहा महिने सापडत नाही. आता ती गायब झाली. हे कसले लक्षण म्हणायचे? आता तर मुंबई हायकोर्टानेच राज्यपालांना विचारले आहे, ‘साहेब, त्या फाईलचे काय झाले?’ त्यामुळे फाईल कोणत्या भुतांनी पळवली, याचा खुलासा राज्यपालांनाच करावा लागेल, अशी मागणीही राऊत यांनी केली.

First published: