मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

भारतात 'मिक्स अँड मॅच' कोरोना लसीवर विचार सुरू, Pfizer-AstraZeneca च्या चाचणीत मिळाले चांगले संकेत

भारतात 'मिक्स अँड मॅच' कोरोना लसीवर विचार सुरू, Pfizer-AstraZeneca च्या चाचणीत मिळाले चांगले संकेत

Covid-19 Vaccination in India - आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले की, शास्त्रीय दृष्ट्या ते शक्य आहे. भारतात ते प्रचंड फायदेशीरही ठरले. भारत आणि विदेशात याबाबत सुरू असलेल्या संशोधनावर नजर असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

Covid-19 Vaccination in India - आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले की, शास्त्रीय दृष्ट्या ते शक्य आहे. भारतात ते प्रचंड फायदेशीरही ठरले. भारत आणि विदेशात याबाबत सुरू असलेल्या संशोधनावर नजर असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

Covid-19 Vaccination in India - आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले की, शास्त्रीय दृष्ट्या ते शक्य आहे. भारतात ते प्रचंड फायदेशीरही ठरले. भारत आणि विदेशात याबाबत सुरू असलेल्या संशोधनावर नजर असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 24 मे: कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेमध्ये (Corona virus Second Wave) लसीच्या संदर्भात एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. एका आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सरकार कोरोना व्हायरलच्या पहिल्या आणि दुसऱ्या लसीमध्ये मिक्स अँड मॅचचा (Mix and match vaccine) विचार करत आहे. News18 शी बोलताना तज्ज्ञांनी सांगितलं की, शास्त्रीय पद्धतीनं हे शक्य आहे आणि भारतात ते फायदेशीरही ठरेल. भारत आणि विदेशात याबाबत सुरू असलेल्या संशोधनावर तज्ज्ञ लक्ष ठेवून आहेत. (consideration on mix and match vaccine)

(वाचा-भयंकर! 24 तासांत फक्त एकाच जिल्ह्यात सापडली 374 कोरोना पॉझिटिव्ह लहान मुलं)

आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्रझेन्का (Oxford-AstraZeneca) आणि फायजर-बायोएनटेक (Pfizer-BioNTech) या लसींचे मिक्स अँड मॅच (दोन्ही मिळवून एक लस बनवणे) बनवण्याचं काम सुरू आहे. त्याचवेळी भारत सरकारच्या आरोग्य तज्ज्ञांचा हा सल्ला समोर आला आहे, हे महत्त्वाचं आहे.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते मिक्स अँड मॅचवर काम शक्य आहे, पण भारतात अजून यावर संशोधन होणं गरजेचं आहे. लसींचे डोस मिक्स करायला हवे की नाही, याबाबत काही ठाम सांगितले जाऊ शकत नाही. अद्याप याचे शास्त्रीय पुरावे समोर आलेले नाहीत. पण भविष्यात असे होईल का हे संशोधन आणि WHO वर अवलंबून असेल. पण यावर काही दिवसांत अभ्यास सुरू होऊ शकतो आणि यामुळं देशात लसीचा पुरवठा करणं सोपं होईल. या वर्षाच्या अखेरीपर्यंत आठ लसींना मान्यता मिळण्याची शक्यता असल्याचंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

(वाचा-Supreme Court ची सरकारला विचारणा, डेथ सर्टिफिकेटवर कोरोनाचा उल्लेख का नाही?)

भारतासंबंधी शक्यता

भारत सरकारने डिसेंबरपर्यंत 216 कोटी लसी उपलब्ध करण्याची योजना जाहीर केली आहे. त्यात किमान आठ व्हॅक्सिन कंपन्यांचा समावेश आहे. पुण्याच्या सीरम इंन्स्टीट्यूट ऑफ इंडिया द्वारे स्थानिक पद्धतीने निर्मित ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राझेन्काची कोविशिल्ड, भारत बायोटेक द्वारा निर्मित कोव्हॅक्सिन, रशियाची स्पुटनिक-V, भारत बायोटेकची इंट्रानेसल व्हॅक्सिन, बायोई की सबयुनिट व्हॅक्सिन, झायडस कॅडिलाची डीएनए व्हॅक्सीन, नोव्हावॅक्सची लस आणि जेनोवाची एमआरएनए व्हॅक्सिन.

तज्ज्ञांच्या मते सध्या फक्त अ‍ॅस्ट्राझेन्का आणि फायजरच्या मिक्स अँड मॅचचा डेटा उपलब्ध आहे. भारतात याचा वापर करण्याआधी अनेक प्रकारचा अभ्यास करावा लागणार आहे. वैज्ञानिक दृष्टा ही चांगली पद्धत आहे. पण त्याला ठोस पुरावा लागेल. लसींना एकत्रित करणे हे नागरिक आणि समुहांमध्ये विषाणूच्या संसर्गाला रोखण्यासाठी फायदेशीर ठरेल.

काही अभ्यासांत वेगवेगळ्या लसी मिक्स केल्यास कोविड विरोधात अधिक सुरक्षा मिळते असं समोर आलं आहे. स्‍पेनमध्ये संशोधकांना सकारात्मक परिणाम मिळाले आहेत. पण अद्याप ते अधिकृतरित्या समोर आलेलं नाही. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या अभ्यासात समोर आलेल्या तथ्यांनुसार, जर दोन लसी एकत्रित केल्या तर फारसा काही धोका होत नाही. पण साईट इफेक्ट वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

First published:

Tags: Corona vaccine, Coronavirus, India