नागपुरमध्ये कोरोना वाढतोय, एका दिवसांत रुग्णांची संख्या पोहोचली 44 वर

नागपुरमध्ये कोरोना वाढतोय, एका दिवसांत रुग्णांची संख्या पोहोचली 44 वर

नागपूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या ४४ वर पोहोचली आहे. अशात दिवसाला नवीन आकडे समोर येतात. त्यामुळे प्रशासनासमोरही मोठं आव्हान आहे.

  • Share this:

नागपूर, 13 एप्रिल : नागपूरात कोरोनाची संख्या वाढत चालली आहे. काल नागपूरात कोरोनाचे आणखी तीन रुग्ण वाढले. काल एका दिवसांत 17 रुग्णांचे नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे नागपूरकरांची चिंता आता वाढत चालली आहे. नागपूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या ४४ वर पोहोचली आहे. अशात दिवसाला नवीन आकडे समोर येतात. त्यामुळे प्रशासनासमोरही मोठं आव्हान आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सर्व रुग्णांवर मेडीकल मेयो आणि आमदार निवासमध्ये उपचार सुरू आहेत. नव्या पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा युद्धपातळीवर शोध सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. आतापर्यंत नागपूरात आठ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

लॉकाडाऊनमध्ये अशी शिक्षा पहिल्यांदाच, घरातून बाहेर पडलात तर पोलीस ऐकवणार 'हे' गा

काल संध्याकाळपर्यंत नागपूरमध्ये 14 जणांना कोरोनाची लागण झाली होती. हे 14 जण दिल्लीतील मरकजहून परतले होते. त्यांना नागपूरच्या आमदार निवास येथे क्वारंटाईन करण्यात आलं होतं. रविवारी त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. यातील 9 नागपूर शहरातील, 1 नागपूर जिल्ह्याच्या कामठी तालुक्यातील तर 4 मध्य प्रदेशमधील जबलपूर येथील आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली होती.

एकीकडे देशभरात कोरोनाचा (Coronavirus) फैलाव झपाट्याने वाढत असून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे. कोरोनाचा (Covid - 19) फैलाव रोखण्यासाठी अनेक राज्यांमधील लॉकडाऊनची मर्यादा वाढविण्यात आली आहे. तर दुसरीकडे मीडिया रिपोर्टनुसार भारतात अवघ्या 4 दिवसात 80 नव्या जिल्ह्यांमध्ये कोरोना पोहोचला आहे. यापूर्वी 8 एप्रिलपर्यंत 284 जिल्ह्यांमधील संसर्गाची प्रकरण समोर आली होती. आता त्यात वाढ झाली असून ही संख्या 364 पर्यंत पोहोचली आहे.

अर्ध्या भारताला कोरोनाने वेढलं, रुग्णांची संख्या 8,400 वर तर 273 जणांचा मृत्यू

मुंबईत (Mumbai) 217 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली असून 16 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय आतापर्यंत येथे 1399 कोरोनाबाधितांचा आकडा पोहोचला असून मृतांची संख्या 97 इतकी आहे. तर आतापर्यंत 97 जणं बरे होऊन घरी गेले आहेत.

First published: April 13, 2020, 7:59 AM IST

ताज्या बातम्या