कोल्हापूर, 13 एप्रिल : देशात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्याला रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याची वेळ आली. शाळा, कॉलेज, रुग्णालये, खासगी ऑफिसस, वाहतूक सेवा या सगळ्यांवर बंदी घालण्यात आली. शक्य तितक्या सगळ्या उपाययोजना केल्या तरी कोरोनाचं संक्रमण वाढत आहे. यामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कोरोना रुग्ण आहेत. पण तरी लोक नियम मोडायचं काही थांबवत नाही. अजूनही दूध टँकरमधून प्रवासी वाहतूक सुरूच आहेच.
कोल्हापूर जिल्ह्यातील हा दुसरा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. गोकुळच्या टँकरमधून प्रवासी वाहतूक करत असल्याचं समोर आलं आहे. सोशल डिस्टंसिंगचा फज्जा पाडत मुंबईहून तीन प्रवासी कोल्हापूरला गेले. गडहिंग्लज पोलिसांनी तीन प्रवाशांसह चालकाला ताब्यात घेतलं आहे. तर प्रवासी वाहतूक केल्याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील एन एम जोशी मार्ग येथून या 3 प्रवाश्यांना आणल्याचं सांगण्यात येत आहे.
अर्ध्या भारताला कोरोनाने वेढलं, रुग्णांची संख्या 8,400 वर तर 273 जणांचा मृत्यू
क्लिनर आणि गोकुळचे कर्मचारी असल्याचे सांगून टँकर गडहिंग्लजपर्यंत पोहोचला. या 4 जणांची वैद्यकीय तपासणी होणार असल्याची माहिती सूत्रांकजून देण्यात आली आहे. याआधीही संचारबंदी असल्याने दुधाच्या टँकरमधून चक्क कामगारांना गावी घेवून जात असल्याचा प्रकार तलासरीत उघड झाला होता. कल्याणहून राजस्थानकडे दुधाच्या टँकमध्ये कामगारांना बसवून घेवून जात असताना तपासणी दरम्यान तलासरी पोलिसांनी कारवाई केली होती.
तलवारीनं केक कापून टिकटॉकवर व्हिडीओ केला व्हायरल, वकील पिता-पुत्रावर गुन्हा
अर्ध्या भारताला कोरोनाने वेढलं, रुग्णांची संख्या 8,400 वर तर 273 जणांचा मृत्यू
एकीकडे लोक नियम मोडतात तर दुसरीकडे कोरोना आता देशाच्या मानगुटीवर बसला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे, आत्तापर्यंत देशात कोरोना विषाणूची 8,933 प्रकरणे नोंदली गेली आहेत आणि 296 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 981 लोक बरे झाले आहेत आणि त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 918 प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि 34 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण प्रकरणांची संख्या 8,447 आहे आणि मृतांची संख्या 273 आहे. आतापर्यंत 765 लोक बरे झाले आहेत. तामिळनाडूमध्ये कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या एक हजारांवर गेली आहे.