मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /तुम्हीही प्रेशर कुकरमध्ये शिजवलेला भात खाता ना? मग या गोष्टी तुम्हाला माहीत असाव्यात

तुम्हीही प्रेशर कुकरमध्ये शिजवलेला भात खाता ना? मग या गोष्टी तुम्हाला माहीत असाव्यात

तांदळामध्ये (Rice) आढळणाऱ्या विशेष गुणधर्मांमुळे अनेक लोक आपल्या रोजच्या आहारात त्याचा समावेश करतात. मात्र, तांदुळ शिजवण्याची योग्य पद्धत आपण जाणून घेणे महत्त्वाचे आहे. बरेच लोक प्रेशर कुकरमध्ये (Presser cooker) भात शिजवतात

नवी दिल्ली, 03 नोव्हेंबर : तांदळामध्ये (Rice) आढळणाऱ्या विशेष गुणधर्मांमुळे अनेक लोक आपल्या रोजच्या आहारात त्याचा समावेश करतात. मात्र, तांदुळ शिजवण्याची योग्य पद्धत आपण जाणून घेणे महत्त्वाचे आहे. बरेच लोक प्रेशर कुकरमध्ये (Presser cooker) भात शिजवतात, तर काही लोक वाफवण्याची किंवा उकळण्याची पद्धत उत्तम मानतात.

वाफवलेला भात चांगला कि प्रेशर कुकरचा

प्रेशर कुकरमध्ये (Presser cooker) शिजवलेला तांदूळ त्याच्या पोतमुळे चांगला लागतो, पण वाफवलेला भात यापेक्षा जास्त आरोग्यदायी असल्याचे सांगितले जाते. प्रेशर कुकरमध्ये शिजवलेल्या भातामधून स्टार्च काढून टाकला जातो, त्यामुळे चरबी कमी होते आणि वजन वाढत नाही. परंतु, तज्ञांच्या मते स्टार्चसह वाफवलेल्या तांदळातून पाण्यात विरघळणारे पोषक कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिने देखील निघून जातात.

त्याचे फायदे काय

जेव्हा प्रेशर कुकरमध्ये भात शिजवला जातो, तेव्हा उच्च दाब आणि उष्णता यामुळे तांदळातील गुणधर्म आणखीन फायदेशीर बनतात. वाफवलेले तांदूळ किंवा उकडलेले तांदूळ शिजवण्याच्या इतर पद्धतींनी तुम्हाला इतके फायदे मिळत नाहीत. प्रेशर कुकरमध्ये शिजवलेला तांदूळ पौष्टिकतेने भरपूर असतो आणि पचनासाठीही चांगला असतो.

हे वाचा - General Medical Check Up : घरच्या घरी करा या 3 सोप्या टेस्ट; 30 सेकंदात कळेल तुम्ही किती निरोगी आहात

प्रथिने, स्टार्च आणि फायबर यांसारख्या मॅक्रोन्यूट्रिएंट्सचे गुणधर्म जास्त उष्णतेनंतर आणखी वाढतात. असा भात तुम्हाला अनेक पौष्टिक फायदे देईल. तसेच उच्च दाबामुळे अनेक प्रकारचे जीवाणू आणि बुरशी नष्ट करण्यास देखील मदत होते. वाफवलेले किंवा उकडलेले तांदळामध्ये ही पद्धत कार्य करत नाही.

हे वाचा - Mental Health : काही केल्या मनातून नकारात्मक विचार जात नाहीयेत; या 5 उपायांनी त्यांना पळवून लावा

वेळ वाचतोच

प्रेशर कुकरमध्ये शिजवलेला भात तुमच्यासाठी अधिक फायदेशीर आहे. प्रेशर कुकरशिवाय तुम्ही इतर कोणत्याही प्रकारे भात शिजवलात तर तुम्हाला फारसा फायदा होणार नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा प्रकारे भात शिजवल्याने वेळही वाचतो.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही)

First published:

Tags: Health, Health Tips