जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / मुख्यमंत्रिपदाचा तात्पुरता कार्यभार एकनाथ शिंदेकडे? व्हायरल वृत्तामागील काय आहे सत्य..

मुख्यमंत्रिपदाचा तात्पुरता कार्यभार एकनाथ शिंदेकडे? व्हायरल वृत्तामागील काय आहे सत्य..

मुख्यमंत्रिपदाचा तात्पुरता कार्यभार एकनाथ शिंदेकडे? व्हायरल वृत्तामागील काय आहे सत्य..

उद्या मुख्यमंत्र्यांच्या मानेवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 नोव्हेंबर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांना मानेवरील शस्त्रक्रियेसाठी रिलायन्स उद्योग समुहाच्या हरकिसनदास सुपरस्पेशालिटी  (Reliance Harkishandas Superspeciality Hospital) रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उद्या त्यांच्यावर सकाळी शस्त्रक्रिया होणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. यानंतर काही दिवस ते आराम करणार असल्याचंही सांगितलं जात आहे. दरम्यान सोशल मीडियावर एक वृत्त व्हायरल (Viral On Social Media) होत असल्याने अनेक सवाल उपस्थित झाले आहे. मुख्यमंत्रिपदाचा तात्पुरता कार्यभार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे वृत्त सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे. त्यामुळे अनेकांकडून सवाल उपस्थित केले जात आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी स्वत: याबद्दल खुलासा केला आहे. (Eknath Shinde temporarily takes over as CM What is the truth behind the viral news) काय म्हणाले एकनाथ शिंदे… मुख्यमंत्रिपदाचा तात्पुरता कार्यभार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे वृत्त सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे. त्यात कुठलेही तथ्य नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्यावर उद्या एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात येणार असून, त्यानंतर अवघे तीन ते चार दिवस आराम केल्यानंतर ते पुन्हा जनतेच्या सेवेत रुजू होतील. आई जगदंबेचा कृपाशीर्वाद आणि तमाम जनतेच्या सदिच्छा उद्धव ठाकरे साहेबांसोबत आहेत. त्यामुळे समाजमाध्यमावर फिरणाऱ्या खोट्या आणि खोडसाळ मेसेजस आणि पोस्टवर विश्वास ठेवू नये, ही नम्र विनंती. हे ही वाचा- BREAKING : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीबद्दल महत्त्वाची अपडेट गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्र्यांना पाठीचा त्रास सुरू होता. त्यातून बरे झाल्यानंतर त्यांना पुन्हा मानेचा त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे बुधवारी (10 नोव्हेंबर) कॅबिनेटच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी आपल्या आरोग्याबाबतची माहिती दिली होती. मानेजवळील स्नायू दुखावले गेले असून सोमवारी केलेल्या तपासणीत हे स्पष्ट झालं. सुरुवातीला घरीच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. पण, तपासणी केली असता डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. अखेर, मुख्यमंत्र्यांनी शस्त्रक्रिया करण्यास होकार दर्शवला आणि ते रुग्णालयात दाखल झाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात