Home /News /mumbai /

BREAKING : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीबद्दल महत्त्वाची अपडेट

BREAKING : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीबद्दल महत्त्वाची अपडेट

सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घरगुती उपचार सुरू आहेत. तब्येतीत सुधारणा देखील आहे. मात्र, पुन्हा एकदा मान आणि पाठदुखीचा त्रास होऊ नये

सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घरगुती उपचार सुरू आहेत. तब्येतीत सुधारणा देखील आहे. मात्र, पुन्हा एकदा मान आणि पाठदुखीचा त्रास होऊ नये

गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना पाठीचा त्रास सुरू होता. त्यातून बरे झाल्यानंतर त्यांना मानेचा त्रास सुरू झाल्याने अखेर त्यांना काल रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

    मुंबई, 11 नोव्हेंबर : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांनी बुधवारी रिलायन्स उद्योग समुहाच्या हरकिसनदास सुपरस्पेशालिटी  (Reliance Harkishandas Superspeciality Hospital) रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आज त्यांच्या प्रकृतीबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना पाठीचा त्रास सुरू होता. त्यातून बरे झाल्यानंतर त्यांना मानेचा त्रास सुरू झाल्याने अखेर त्यांना काल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. (Important update on the health of Chief Minister Uddhav Thackeray) त्यांच्यावर मानेची शस्त्रक्रिया (Spine surgery) करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू असताना महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर उद्या सकाळी ७ ते ८ दरम्यान रिलायन्स उद्योग समुहाच्या हरकिसनदास सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये (Reliance Harkishandas Superspeciality Hospital) शस्रक्रिया होणार आहे. जेष्ठ आर्थो सर्जन डाॅक्टर शेखर भोजराज हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्रक्रिया करणार असल्याची माहिती समोर आली आहे. हे ही वाचा-'एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात...' म्हणत मुख्यमंत्र्यांचे भावनिक आवाहन गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्र्यांना पाठीचा त्रास सुरू होता. त्यातून बरे झाल्यानंतर त्यांना पुन्हा मानेचा त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे बुधवारी (10 नोव्हेंबर) कॅबिनेटच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी आपल्या आरोग्याबाबतची माहिती दिली होती. मानेजवळील स्नायू दुखावले गेले असून सोमवारी केलेल्या तपासणीत हे स्पष्ट झालं. सुरुवातीला घरीच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. पण, तपासणी केली असता डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. अखेर, मुख्यमंत्र्यांनी शस्त्रक्रिया करण्यास होकार दर्शवला आणि ते रुग्णालयात दाखल झाले.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Health, Mumbai, Shivsena, Udhav thackeray

    पुढील बातम्या