Home /News /mumbai /

Exclusive : आताची सर्वात मोठी बातमी, रात्रीच्या अंधारात शिंदे अन् फडणवीसांची भेट? पुढील प्लान आखल्याची चर्चा

Exclusive : आताची सर्वात मोठी बातमी, रात्रीच्या अंधारात शिंदे अन् फडणवीसांची भेट? पुढील प्लान आखल्याची चर्चा

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

दोघेही काल रात्री बडोद्याला रवाना झाले होते. यावेळी ते भेटल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

    मुंबई, 25 जून : सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोठींमधील सर्वात मोठी बातमी (Big News) समोर आली आहे. काल रात्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे इंदूरमार्गे बडोद्याला रवाना झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे हेदेखील काल गुवाहाटीवरुन बडोद्याल्या गेल्याचं समोर आलं आहे. येथे त्यांची भेट झाल्याची चर्चा रंगली आहे. यावेळी त्यांनी पुढील प्लान रचल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या भेटीबाबत कोणतीही पुष्टी मिळाली नसली तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याच कारणासाठी दोघे बडोद्याला जाण्याची शक्यता दाट आहे. देवेंद्र फडणवीस इंदूरहून बडोद्याला रवाना... पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीसांबद्दलची गुप्त (Devendra Fadanavis yesterday left Indore for Baroda) माहिती समोर आली आहे. परतीच्यावेळेसही ते आधी इंदूरला आले आणि येथून मुंबईल परतले. महाराष्ट्रातील एअरपोर्ट शिवसेनेच्या ताब्यात असल्या कारणाने फडणवीसांना आपली यात्रा गोपनीय ठेवली आणि इंदूरला येऊन गुजरातला गेले. त्यांच्या या प्रवासादरम्यान दोन्हीही वेळेस कोणी विमानातून उतरलं नाही आणि चढलंदेखील नाही. विमानात केवळ इंधन भरण्यात आलं. मुंबईपासून वडोदरा अवघ्या 400 किलोमीटरवर आहे. आणि मुंबईहून इंदूर 600 किलोमीरट. अशात मुंबईहून थेट वडोदरा जाण्याऐवजी फडणवीस इंदूरच्या मार्गाने येथे का गेले? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून आपली गुजरात दौरा लपवण्यासाठी ते व्हायाला इंदूरहून गेले. काल 24 जून रोजी सायंकाळी त्यांच्या दौऱ्याची माहिती मिळाली होती. त्यावेळी अधिकाऱ्यांना वाटलं की, फडणवीसांसोबत इंदूरहून कोणी जाईल किंवा परत येईल. मात्र दोन्ही वेळेस विमानात दुसरं कोणीच चढलं वा उतरलं नाही. अधिकाऱ्यांनाही कळालं नाही की, जर त्यांना वडोदऱ्याला जायचं होतं, तर इंदूरला का आले. कारण मुंबई ते वडोदरा हवाई मार्गाने सरळ आहे. तर इंदूर दुसऱ्या दिशेला आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: BJP, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Gujrat, Shivsena

    पुढील बातम्या