डोंबिवली, 10 एप्रिल : राज्यातील कोरोना रुग्णांचे आकडे दिवसेंदिवस वाढत असल्यामुळं राज्यसरकारनं दर आठवड्याला दोन दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केलाय. या लॉकडाऊनला सुरुवातील सगळीकडूनच विरोध करण्यात आला. मात्र सरकारनं लॉकडाऊनचा निर्णय ठामपणे कायम ठेवला, त्यामुळं शनिवारी राज्यात बहुतांश भागांमध्ये लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी कायम गजबजलेले असणारे रस्ते यामुळं सामसूम झाल्याचं पाहायला मिळालं. डोंबिवलीतही असंच चित्र पाहायला मिळालं.
वाचा - 'आम्हाला खूप वर्कलोड' म्हणत यमराजच उतरले रस्त्यावर, नियमांचं पालन करण्याचं आवाहन
डोंबिवलीमध्ये असलेला मानपाडा रोड कायम गडबजलेला असा परिसर आहे. याठिकाणी नेहमीच लोकांची, वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी आणि वर्दळ दिसून येत असते. पण वीकेंड लॉकडाऊनच्या निमित्ताने शनिवारी पुन्हा एकदा हा परिसर सामसूम झाला होता. डोंबिवलीतील जयेश म्हात्रे या तरुणानं त्याच्या ड्रोन कॅमे-याच्या माध्यमातून या रस्त्याचे दृश्य टिपले आहे.
डोंबिवलीतील स्टार कॉलनी ते मानपाडा पेट्रोल पंप या भागातील हे दृश्य आहे. एऱ्हवी हा रस्ता किंवा संपूर्ण परिसरच 24 तास गजबजलेला असतो. याठिकाणी कायम वाहनांची गर्दी पाहायला मिळत असते. अेनकदा तर या भागात वाहतुकीची कोंडी होते. पण शनिवारचं याठिकाणचं चित्र अगदी वेगळं होतं. याठिकाणी बोटावर मोजता येतील एवढी वाहनं रस्त्यावरून जाताना दिसली. त्यातही बहुतां रिक्षा किंवा कामानिमित्त बाहेर पडलेल्यांच्या दुचाकी असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं या कडक लॉकडाऊनमुळं मानपाडा रोडवर पुर्णत: शुकशुकाट पाहायला मिळाला.
वाचा - रुग्णालयाचा सावळागोंधळ; जिवंत कोरोना रुग्णाला मृत ठरवलं, मृत्यूचा दाखलाही दिला
एकूणच या लॉकडाऊनच्या विरोधात अनेक नेते, व्यापारी यांनी विरोधातली भूमिका घेतली होती. पण प्रत्यक्ष लॉकडाऊनच्या विरोधात जात कोणी दुकानं उघडल्याचं मात्र पाहायला मिळालं नाही. आर्थिक दृष्टीनं व्यापाऱ्यांचा संताप योग्य आहे. पण तसं असलं तरी महामारीच्या संसर्गाची जाणीव असल्याचं व्यापाऱ्यांनीही दाखवून दिलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Dombivali, Lockdown