'राजगृह' तोडफोड प्रकरणी उद्धव ठाकरे संतापले, पोलिसांना दिले कठोर आदेश

'राजगृह' तोडफोड प्रकरणी उद्धव ठाकरे संतापले, पोलिसांना दिले कठोर आदेश

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या 'राजगृहा'च्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला, हे धक्कादायक आहे.

  • Share this:

मुंबई, 8 जुलै: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या 'राजगृहा'च्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला, हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समजाचे श्रद्धास्थान आहे. आपला ग्रंथ खजिना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तुत जपून ठेवला. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तीर्थक्षेत्रच आहे. राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. कडक कारवाईचे आदेश मी पोलिसांना दिले आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे

हेही वाचा.. शरद पवार यांच्या 'मातोश्री' भेटीवरुन भाजप नेत्याचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

दादर भागात असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान 'राजगृह'वर मंगळवारी संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड झाली आहे. घराच्या काचांवरही दगडफेक झाली असून कुंड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. पोलिस घटनास्थळी तपास करत आहेत. आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांना देण्यात आले आहे. आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे.

दरम्यान, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी इथे दररोज भेटीला येत असतात. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे स्थान आहे.

राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची गय करणार नाही...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील या प्रकरणावर भाष्य केले असून राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही असं स्पष्ट केलं आहे. राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समाजाचे श्रद्धास्थान आहे. आपला ग्रंथखजीना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तुत जपून ठेवला. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तीर्थक्षेत्रच आहे. राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. कडक कारवाईचे आदेश पोलिसांना दिले आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

दुसरीकडे, राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राजगृहाला भेट दिली. तिथे त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं.

हेही वाचा.. मोठी बातमी, अजित पवारांचा संभाजीराजेंना फोन, बैठकीचे दिले निमंत्रण

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच त्यांनी सर्वांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. सगळ्या आंबेडकरवाद्यांनी शांतता राखावी, ही गोष्ट खरी आहे की राजगृहावर दोघेजण आले त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा आणि इतर गोष्टी तोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घातलं. पोलिसांनी त्यांचं कर्तव्य केलं, असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: July 8, 2020, 1:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading