जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / भाजप नेत्याने दिली जिवे मारण्याची धमकी; छळाने कंटाळलेल्या शेतकऱ्यांने उचललं टोकाचं पाऊल

भाजप नेत्याने दिली जिवे मारण्याची धमकी; छळाने कंटाळलेल्या शेतकऱ्यांने उचललं टोकाचं पाऊल

भाजप नेत्याने दिली जिवे मारण्याची धमकी; छळाने कंटाळलेल्या शेतकऱ्यांने उचललं टोकाचं पाऊल

या प्रकरणी नेकनूर पोलिसांनी भाजपा जि.प.सदस्य राणा डोईफोडे यांच्यासह अन्य चौघा जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

बीड 7 जुलै: वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या (Farmer commits suicide) केल्याची घटना बीड (Beed) तालुक्यातील डोईफोडवाडी येथे उघडकीस आली आहे. किसन धोंडीबा डोईफोडे असं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे नाव आहे. त्यांचाच पुतण्या असलेल्या भाजप नेत्याने ही धमकी दिली होती. धमकी देणारा भाजपाचा नेता असून जिल्हा परिषद सदस्य (ZP Bjp Leader) असून त्यांचा पुतण्याच आहे. या प्रकरणी नेकनूर पोलिसांनी भाजपा जि.प.सदस्य राणा डोईफोडे यांच्यासह अन्य चौघा जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. किसन धोंडीबा डोईफोडे व सर्जेराव डोईफोडे हे दोघे सख्खे बंधू आहेत. यांच्यात वडिलोपार्जित जमीनीवरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. सोमवारी किसन डोईफोडे हे आपल्या शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. त्यांनी बोअर सुरू केला असता सर्जेराव धोंडीबा डोईफोडे, राणा सर्जेराव डोईफोडे, कालिंदा डोईफोडे, शीतल डोईफोडे, मनोज डोईफोडे या सर्वांनी मिळून लाथाबुक्क्यांनी त्यांना मारहाण केली व कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी उलट किसन डोईफोडे यांच्यावरच नेकनूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर रात्री नऊच्या वाजता पुन्हा किसन डोईफोडे यांच्या घरी येऊन तुम्हाला पाहून घेतो, असे म्हणत जीवे मारण्याच्या धमक्या देऊन निघून गेले. औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू या मुळे त्रस्त झालेल्या किसन डोईफोडे यांनी मध्यरात्री लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी नेकनूर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे. चुलता, चुलत भाऊ व कुटुंबातील अन्य सदस्यांच्या जाचास कंटाळून माझ्या पित्याने आत्महत्या केल्याची तक्रार प्रदीप किसनराव डोईफोडे यांनी दिली आहे. लेकराला नाही घेऊ शकले लॅपटॉप, हताश बळीराजानं उचललं टोकाचं पाऊल त्यानुसार भाजपा नेते आरोपी राणा डोईफोडे, सर्जेराव डोईफोडे, कालिंदा डोईफोडे, शीतल डोईफोडे या चौघांविरोधात कलम 306, 325,504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात