जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / दिल्लीतून उगम पावलेले 'हे' ग्रहण कधी सुटणार? धनंजय मुंडेंची खोचक टीका

दिल्लीतून उगम पावलेले 'हे' ग्रहण कधी सुटणार? धनंजय मुंडेंची खोचक टीका

दिल्लीतून उगम पावलेले 'हे' ग्रहण कधी सुटणार? धनंजय मुंडेंची खोचक टीका

धनंजय मुंडे यांनी सूर्यग्रहण सुटताच मोदी सरकारवर टीका करणारे ट्वीट केले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई,26 डिसेंबर: राष्ट्रवादीचे फायरब्रँड नेते आणि विधानपरिषदेचे माजी विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. धनंजय मुंडे यांनी सूर्यग्रहण सुटताच मोदी सरकारवर टीका करणारे ट्वीट केले आहे. ‘आर्थिक डबघाई, बेरोजगारी, महिला सुरक्षा, #CAA_NRC साठी सुरु असलेला हिंसाचार, कायदा सुव्यवस्था याकडे सरकारचे लक्ष वेधत दिल्लीतून उगम पावलेले हे ग्रहण कधी सुटणार? असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला आहे. धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्वीटसोबत सूर्यग्रहण पाहणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्रही पोस्ट केले आहे.

जाहिरात

दुसरीकडे, खगोलीय अविष्कार कंकणाकृती सूर्यग्रहण गुरुवारी झाले. भारतासह जगभरात अनेक ठिकाणी हे सूर्यग्रहण दिसले. खगोलप्रेमींसह सर्वांनीच हे विलोभनीय दृश्य पाहिले. काही ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे हे सूर्यग्रहण दिसू शकले नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सूर्यग्रहण पाहिले. मात्र, ढगांमुळे सूर्य दिसला नाही, असे ट्वीट मोदींनी केले आहे. पंतप्रधान मोदींनी ट्वीट करून म्हटले की, भारतातील अनेक लोकांप्रमाणे मी देखील 2019 मधील अखेरचे सूर्यग्रहण पाहण्यासाठी उत्सुक होतो. पण मला ढगांमुळे सूर्य दिसला नाही. पण कोझीकोड आणि इतर भागातील ग्रहणाची दृश्ये लाइव्ह स्ट्रिमिंगवर पाहिली. तज्ज्ञांशी चर्चा करून याबद्दल माहिती देखील घेतली. पंतप्रधान मोदींनी सूर्यग्रहण पाहण्यासाठी लागणारा खास चष्माही घेतला होता. त्याचा फोटोही त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला. हा फोटो ट्वीट करत एका युजरने आता मीम व्हायरल होतील, असे म्हटले. त्यावर मोदींनी उत्तर देत म्हटले की, तुमचे स्वागत आहे. एन्जॉय करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात