नवी मुंबई, 29 मे : नवी मुंबईतून (Navi Mumbai) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पनवेलच्या उलवे येथे भर दिवसा दरोडा (Roberry) पडला आहे. दरोडेखोरांनी आज दुपारी TUV 300 गाडीच्या चालकावर प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर लुटारु गाडी घेऊन फरार झाले. दोन अज्ञात आरोपींनी चालकावर हल्ला (attack on driver) केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आरोपींनी हल्ला केल्यानंतर गाडी घेऊन पलायन केलं. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पण या घटनेमुळे पनवेलमध्ये (Panvel) एकच खळबळ उडाली आहे. संबंधित हल्ल्याची घटना ही पनवेलच्या उलवे सेक्टर 19 मध्ये घडली. या प्रकरणी NRI पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गाडीमध्ये महत्त्वाचे कागदपत्रे होते. तसेच काही रोकडही होती. हल्लेखोर अचानक आले आणि चालकावर मागून हल्ला करुन पळून गेले. यावेळी त्यांनी गाडीदेखील पळवून नेली. पोलीस आता आरोपींचा शोध घेत आहेत. ( काल सुरक्षा हटवली; आज प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या ) आरोपी भर दिवसा येतात, एका गाडीच्या चालकावर त्याला नकळत त्याच्यावर हल्ला करतात, त्यानंतर त्याची गाडी पळवून नेतात, या सर्व घटनाक्रमामुळे उलवे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आरोपी भर दिवसा एवढी मोठी हिंमत तरी कशी करु शकतात, त्यांना पोलिसांचा काहीच धाक राहिलेला नाही का? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. पोलीस या प्रकरणी आरोपींना कधीपर्यंत अटक करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण आरोपींनी भरदिवसा अशाप्रकारचं कृत्य केल्यामुळे त्यांच्या पुढील आव्हान वाढलं आहे. आरोपींनी अशाप्रकारचं धाडस केल्यामुळे आरोपींना पोलिसांचं वचक राहिलेलं नाही का? असा प्रश्न साहजिकच उपस्थित केला जातोय. त्यामुळे आरोपींच्या मुस्क्या लवकरात लवकर आवळणं हे पोलिसांचं ध्येय असू शकतं. दरम्यान, पोलीस आरोपींना लवकर अटक करतील, अशी आशा स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.