मुंबई 15 जुलै : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिवतीर्थावर जात राज ठाकरेंची भेट घेतली (Devendra Fadnavis Raj Thackeray Meeting). गुरूपौर्णिमेदिवशीच त्यांची भेट होणार होती . मात्र पावसामुळे ही भेट होऊ शकली नाही. अशात आज दोघांचा भेट झाली. यावेळी त्यांनी दीड तास चर्चा केली. दोघांनी काही वेळ अँटिचेंबरमध्येही चर्चा केली. यावेळी मनसे आणि भाजप नेतेही उपस्थित होते. ठाकरे-शिंदे संघर्ष! ठाकरेंनी हकालपट्टी केलेल्यांना शिंदेंकडून पुन्हा पदं; पुर्ननियुक्त्या करत दिले महत्त्वाचे आदेश फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यावेळी राज ठाकरेंनी कौतुक करणारं पत्र लिहिलं होतं. ही सदिच्छा भेट सांगितली जात असली, तरी यात दीड तास चर्चा झाली आहे.
राज ठाकरेंसोबतच्या भेटीनंतर सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी गेले उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस pic.twitter.com/9Q6Jy1xOCe
— News18Lokmat (@News18lokmat) July 15, 2022
दोन्ही नेत्यांनी एकट्यात चर्चाही केली आहे. त्यामुळे मनसे भाजपची युती होणार का, याचं उत्तर दोन महिन्यात मिळेलच. Video: “दादा तुमच्या शब्दावर आम्ही मतं दिली…”, संतापलेल्या दशरथ सावंतांच्या कार्यकर्त्यांनी अडवला अजित पवारांचा ताफा बहुमत चाचणीमध्ये मनसेच्या एकमेव आमदाराने भाजपच्या बाजूने मतदान केलं होतं. त्यामुळे मनसे आता भाजपसोबत जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान या भेटीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सिद्धिविनायक मंदिरात पोहोचले. काही वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सिद्धिविनायक मंदिरात येणार असल्याचं समोर येत आहे.