मुंबई, 13 जुलै : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल याचा काहीच भरोसा नाही. राज्यात अडीच वर्षांपूर्वी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी एकत्रित येवून महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. या तीनही पक्षांनी एकत्रित येणं हे अनपेक्षित होतं. विशेष म्हणजे अडीच वर्षात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारत 39 आमदारांना घेवून भाजपसोबत हातमिळवणी केली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती. शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना ही महाविकास आघाडीत असल्याचा दावा केला जात होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस हे एकत्र असल्याचं चित्र होतं. पण काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलं. या पत्रात त्यांनी शिवसेनेवर टीका केली. त्यांच्या टीकेची दखल घेवून देवेंद्र फडणवीस यांनी लगेच ट्विटरवर प्रतिक्रिया देत आपण याबाबत निर्णय घेऊ, असं आश्वासन दिलं. त्यामुळे आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना विरोधात भाजप आणि काँग्रेस एकत्र येणार की काय? अशा उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. मिलिंद देवरा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. त्या पत्रात त्यांनी शिवसेनेकडून करण्यात आलेली वॉर्डरचना ही अनधिकृत किंवा अवैध आहे, असं म्हटलं आहे. दरम्यान, देवरा यांनी ‘News18 लोकमत’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी शिवसेनेवर टीका केली. “मुंबई महापालिका भारतातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे. या मुंबई महापालिकेच्या निवडणुका मुक्तपणे आणि निष्पक्षपणे पार पडल्या आहेत. केवळ एका पक्षाच्या फायद्यासाठी मुंबईच्या वॉर्डरचनांमध्ये फेरबदल करणे हे अनैतिक आणि राजघटनेच्या विरोधात आहे. म्हणून मी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. सर्व पक्षांनी एकत्र यावं आणि नव्याने वॉर्डरचवा व्हावी, असं आवाहन मिलिंद देवरा यांनी केलं. त्यांच्या या भूमिकेची दखल देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.
Shri @milinddeora ji,
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 13, 2022
Received your letter addressed to CM Eknathrao Shinde and me on social media.
We have noted your sentiments & will definitely try to address your concerns for Mumbaikars and for free and fair elections.
Thanks !@mieknathshinde https://t.co/Vbnp5GIzCT
“मिलिंद देवरा जी,सोशल मीडियावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मला उद्देशून तुमचे पत्र मिळाले. आम्ही तुमच्या भावना लक्षात घेतल्या आहेत आणि मुंबईकरांसाठी आणि मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी तुमच्या चिंता दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करू”, असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. ( मेडीगड्डा प्रकल्पात राज्यातील सर्वात मोठा विसर्ग; गोदावरी काठच्या गावांना इशारा ) काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा हे मुंबई महापालिकेच्या प्रभागरचनेच्या मुद्द्यावरुन शिवसेनेवर उघडणे टीका करत असल्याचं चित्र आहे. उद्धव ठाकरे यांचा काँग्रेस संपवण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप मिलिंद देवरा यांनी केला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. देवरा यांच्या या विधानामुळे काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात दुरावा येणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुंबई महापालिकेत ज्याप्रमाणे वॉर्डरचना करण्यात आलीय ती पाहता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा काँग्रेस संपवण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी केला आहे. ही वॉर्ड रचना रद्द करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केलेली आहे. तसेच उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीत असूनही राष्ट्रपदी निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना का पाठिंबा दिला? याबाबत काँग्रेस पक्ष त्यांना विचारणा करणार असल्याचं देवरा यांनी सांगितलं. “महाविकास आघाडी सरकार असताना मुंबईच्या प्रभागरचेनेबाबत निर्णय झाला. या प्रभागरचनेवरुन काँग्रेसने प्रश्न उपस्थित केला होता. तरीही शिवसेना एकतर्फी पुढे गेली. त्यामुळेच मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं”, असं मलिंद देवरा यांनी सांगितलं.

)








