मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मोठी बातमी! मेडीगड्डा प्रकल्पात राज्यातील सर्वात मोठा विसर्ग; गोदावरी काठच्या गावांना इशारा

मोठी बातमी! मेडीगड्डा प्रकल्पात राज्यातील सर्वात मोठा विसर्ग; गोदावरी काठच्या गावांना इशारा

संग्रहित फोटो

संग्रहित फोटो

मेडीगड्डा प्रकल्पात तब्बल 16 लाख पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. हा आतापर्यंतचा राज्यातील सर्वात मोठा विसर्ग आहे. यामुळे गोदावरी नदी काठावर हाय अलर्ट देण्यात आला आहे.

    मुंबई, 13 जुलै : राज्यात सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक नद्या नाल्यांना पूर आले आहेत. राज्यात होत असलेल्या पावसामुळे अनेकांचा मृत्यूही झाल्याचे समोर आले आहे. तसेच अनेक जनावरांवर वीज पडल्याने त्यांचाही मृत्यू झाला आहे. त्यातच आता मुसळधार पावसादरम्यान, एक मोठी बातमी समोर आली आहे. मेडीगड्डा प्रकल्पात तब्बल 16 लाख पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. हा आतापर्यंतचा राज्यातील सर्वात मोठा विसर्ग आहे. यामुळे गोदावरी नदी काठावर हाय अलर्ट देण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत गोदावरी नदीच्या पूर परिस्थितीत मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत संपुर्ण 85 दरवाजे उघडण्यात आले आहेत. तसेच 16 लाख क्युसेक पाण्याचा झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या सिरोंचा तालुक्यात महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमेवर गोदावरी नदीवर हा मेडीगट्टा प्रकल्प आहे. हिंगोलीतही पावसाचे थैमान 15 हजार हेक्टरवर शेतीचे नुकसान - राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाऊस होत असल्याने पिकांबरोबर नागरी जनजीवन विस्कळीत झाले आहे. हिंगोली जिल्ह्यात झालेल्या पावसाने कित्येक जनावरे दगावल्याने शेतकऱ्यांना आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात अतिवृष्टीने जमीनी वाहून गेल्या आहेत. यामध्ये जिल्ह्यातील 15 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. हेही वाचा - Kolhapur Rain Update : कोल्हापूरमध्ये नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ, गावांचा संपर्क तुटला, पंचगंगा इशारा पातळीकडे हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कुरुंदा तसेच परिसरातील गावांच्या शेतातील जमिनी खरडून गेल्या आहेत. सुमारे 15 हजार हेक्टरवरील खरीप पिके, फळपिके, भाजीपाला, बागायती पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. लहान मोठी मिळून सुमारे शंभर जनावरे दगावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याचबरोबर शेकडो घरांची पडझड झाली आहे. नुकसानीचे पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Rain

    पुढील बातम्या