जोरदार शक्तिप्रदर्शन करत भाजपने निवडला आपला विधिमंडळ नेता, मातोश्रीवर शिवसेनेची खलबते

जोरदार शक्तिप्रदर्शन करत भाजपने निवडला आपला विधिमंडळ नेता, मातोश्रीवर शिवसेनेची खलबते

'मातोश्री'वर शिवसेनेची खलबते सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांनी उद्या दुपारी 12 वाजता शिवसेनाभवनात आमदारांची बैठक बोलावली आहे.

  • Share this:

मुंबई,30 ऑक्टोबर: भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन करत निवडला आपला विधिमंडळ नेता निवडला आहे. देवेंद्र फडणवीस यांची एकमताने विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे. विधानभवन परिसरात भाजपचा जोरदार कार्यक्रम सुरू आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता. देवेंद्र फडणवीस तीन टर्म पूर्ण करोत, अशा शुभेच्छाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिल्या. भाजपच्या केंद्रीय निरीक्षक नरेंद्र सिंग तोमर यांच्या नेतृत्त्वात ही प्रक्रिया सुरू झाली. देवेंद्र फडणीस यांच्या विधिमंडळ नेतेपदासाठी चंद्रकांत पाटलांचा प्रस्तावावर सुधीर मुनगंटीवार, हरीभाऊ बागडे, सुरेश खाडे, संजय कुटे, राधाकृष्ण विखे पाटील, देवयानी फरांदे, गणेश नाईक, देवराव होळी, मंगलप्रभात लोढा, शिवेंद्रराजे भोसले, आशिष शेलार यांनी अनुमोदन दिले. नरेंद्र सिंग तोमर यांनी विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांनी निवड करण्यात आली आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील...

वसंतराव नाईक यांची टर्म 11 वर्षांची होती, त्यांचा रेकॉर्ड आम्ही तोडणार आहोत, असे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले. आज सर्वजण खूप आनंदात आहोत. राज्यात बिगर काँग्रेस सरकार पुन्हा आले. पाच वर्षे सलग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टर्म पूर्ण केली. स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा 11 वर्षाचा मुख्यमंत्रिपदाचा रेकॉर्ड देवेंद्र फडणवीस तोडतील. राज्यात सर्वाधिक जागा मिळलेला आपला पक्ष आहे. वयाचा आणि अनुभवाचा आदर आमच्याही मनात आहे. पण वस्तूस्थिती ही वस्तूस्थिती आहे, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना टोला लगावला.

दुसरीकडे,'मातोश्री'वर शिवसेनेची खलबते सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांनी उद्या (गुरूवार) दुपारी 12 वाजता शिवसेना भवनात आमदारांची बैठक बोलावली आहे. आदित्य ठाकरे यांचा उद्या होणारा नियोजित कोकण दौरा रद्द करण्यात आला आहे. सध्या ‘मातोश्री’वर पक्षनेत्यांची खलबते सुरु आहेत. राज्यात मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

विधिमंडळाच्या बैठकीत पराभूत पंकजा मुंडेंचाही समावेश...

परळी विधानसभा मतदार संघातून मोठ्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागलेल्या पंकजा मुंडे यांनी विधिमंडळ बैठकीला उपस्थिती लावली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्याकडून पराभूत झाल्यानंतरही त्यांना मंत्रिपद मिळणार अशी चर्चा होती. त्यातच त्यांनी विधिमंडळाच्या बैठकीत उपस्थिती लावून राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला सुरुवात केली.

सत्ता स्थापनेत आमचा काहीही रोल नाही: पृथ्वीराज चव्हाण

सत्तेसाठी भाजप शिवसेनेला कौल दिला आहे. पण जर काही प्रस्ताव सेनेने दिला तर त्यावर काँग्रेस विचार करील. काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. राज्यात अवकाळी पावसानं मोठं नुकसान झाले आहे. त्यामुळे लवकरात लवकर सरकार बनवून लोकांना दिलासा मिळाला पाहिजे. सत्ता स्थापनेत आमचा काहीही रोल नाही. भाजप सेनेने ठरवायचे आहे सरकार कसे स्थापन करायचे. दोघांच्या भांडणात जनतेचे नुकसान होऊ नये ही अपेक्षा आहे. काही झाले तरी दबावतंत्र वापरुन भाजप सेनेला बरोबर घेऊ शकते, असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

Tags:
First Published: Oct 30, 2019 02:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading