मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /'त्या' वक्तव्याच्या पाठीशी भाजप नाही, पण नारायण राणेंच्या पाठीशी भाजप उभा - देवेंद्र फडणवीस

'त्या' वक्तव्याच्या पाठीशी भाजप नाही, पण नारायण राणेंच्या पाठीशी भाजप उभा - देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis reaction on Narayan Rane comment on CM Uddhav Thackeray: नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Devendra Fadnavis reaction on Narayan Rane comment on CM Uddhav Thackeray: नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Devendra Fadnavis reaction on Narayan Rane comment on CM Uddhav Thackeray: नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई, 24 ऑगस्ट : भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर संपूर्ण राज्यभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. या प्रकरणी आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं, नारायण राणेंनी केलेल्या त्या वक्तव्याचं समर्थन आम्ही करत नाही.

मुख्यमंत्री हे फार महत्त्वाचे पद

देवेंद्र फडणवीस म्हणाले, सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात नारायण राणे यांनी जे काही वक्तव्य केलं त्यातून एक वाद उभा राहिला. मला असं वाटतं की, बोलण्याच्या भरात नारायण राणे तसं बोलले असतील. तसं बोलण्याचं त्यांच्या मनात असेल असं मला वाटत नाही. मुख्यमंत्री हे पद फार महत्त्वाचं आहे. त्या पदाबद्दल बोलत असताना संयम बाळगणे महत्त्वाचे आहे.

Shiv Sena vs BJP: मुंबईत शिवसेना - भाजप कार्यकर्ते भिडल्याचा LIVE VIDEO, पोलिसांचा लाठीमार

त्या वक्तव्याचं समर्थन नाही पण...

महाराष्ट्राचे मुख्मयंत्री स्वतंत्र्याचा अमृतमहोत्सव विसरतात याुळे कोणाच्या मनात संताप निर्माण होऊ शकतो. त्याचा वेगळ्या प्रकारे निषेध केला जाऊ शकतो हे सांगत असताना त्यावर सरकार ज्या पद्धतीने कारवाई करत आहे त्याचं बिलकूल समर्थन केलं जाऊ शकत नाही. एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे सांगतो की, भाजप राणे साहेबांच्या त्या वक्तव्याच्या पाठिशी नाही पण भाजप पूर्णपणे नारायण राणेंच्या पाठिशी आहे.

ज्या प्रकारे पोलिसांकडून कारवाई सुरू आहे त्या बद्दल आश्चर्य वाटतं. शरजिल उस्मानी महाराष्ट्रात येतो हिंदूंच्या विरोधात भाष्य करतो त्याच्यावर कारवाई होत नाही आणि याठिकाणी अख्खं पोलीस फोर्स राणेंना पकडण्यासाठी नाशिक, पुण्याहून निघालं आहे. खरं म्हणजे कायद्याच्या भाषेत हा दखलपात्र गुन्हा नाहीये. मी नाशिकच्या पोलीस आयुक्तांचं पत्र वाचलं ते काय स्वत:ला छत्रपती समजतात का? असा प्रश्नही फडणवीसांनी उपस्थित केला.

“मी समर्थन करत नाही'', नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

देवेंद्र फडणवीसांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

सन्मानीय मुख्यमंत्री यांच्या बाबीत नारायण राणे जे बोलले त्यातून वाद झाला

मोठ्या पदावरच्या व्यक्ती बद्दल असं बोलणे योग्य नाही

पण मुख्यमंत्री जर अमृतमोहत्सव विसरणे यामुळे नाराज होऊ शकतो

आम्ही नारायण राणेंच्या त्या वक्तव्याच्या पाठीशी नाही. पण राणेच्या पाठीशी मात्र आहोत

शरर्जील येवून भारताला आणि हिंदूंना शिव्या देतात तेंव्हा तुम्ही शेपट्या टाकतां

पोलीस आयुक्त स्वत:ला छत्रपती समजतात का?

पोलिसांचा गैरवापर होत आहे. मला पोलिसांबद्दल आदर आहे, ते निष्पक्ष म्हणून ख्याती आहे, पण सध्या त्यांच अधपतन होत आहे

आधीच या सरकारच्या काळात वसुलीकांड झाले त्यामुळे पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलला आहे

प्रत्येक ठिकाणी राज्य सरकारला न्यायालयाची चपराक बसत आहे

पोलिसांना माझा सल्ला आहे. का कायद्याने काम करा. बेकायदा काम करणारे आता कुठे आहेत हे तुम्हाला माहिती आहे

एकाच गोष्टीत किती ठिकाणी गुन्हे दाखल करता

मला आश्चर्य वाटते की शिवसेनावाले सांगत की मुखंमंत्र्यानी सांगितले

आमच्या कार्यालयावर हल्ला झाला तर खबरदार

जर पोलिसांनी कारवाई केली तर आम्ही आंदोलन करू

अवैघपणे जर राणेंना अटक केली तरी ही यात्रा थांबणार नाहीए

त्यांचे युवासैनिक मेळावे घेतात तेव्हा गुन्हे दाखल होत नाही

माझा सवाल आहे, तुम्ही केंद्रीय मंत्र्यांना निर्लज्ज, लाथा घाला म्हणता तेव्हा गुन्हा दाखल होत नाही

आम्ही रस्त्यावर येवून राडा करणारे पक्ष नाही. पण जर आमच्या कार्यालयावर हल्ला

हा स्टेट स्पॉन्सर्ड आहे

First published:
top videos

    Tags: Devendra Fadnavis, Narayan rane